Nanded Swords Siezed : नांदेडमध्ये पुन्हा दहा तलवारी जप्त, एका आरोपीला अटक; नांदेड पोलिस अॅक्शन मोडवर

गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलिसांनी शहरातील दशमेश फायनान्स या दुकानावर धाड टाकली. या धाडीत 10 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.

Nanded Swords Siezed : नांदेडमध्ये पुन्हा दहा तलवारी जप्त, एका आरोपीला अटक; नांदेड पोलिस अॅक्शन मोडवर
नांदेडमध्ये पुन्हा दहा तलवारी जप्त
Image Credit source: TV9
राजीव गिरी

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 08, 2022 | 9:10 PM

नांदेड : नांदेडमध्ये प्राणघातक शस्त्र जप्त करण्याचे धाडसत्र सुरूच आहे. याच दरम्यान रविवारी नांदेडमध्ये दहा तलवारी (Swords) जप्त करून पोलिसांनी एका आरोपीला अटक (Arrest) केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर भागातील दशमेश फायनान्स या दुकानावर धाड टाकत पोलिसांनी या तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी सुनील सिंह आडे नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी नांदेडमध्ये 25 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. पंजाब राज्यातून रेल्वेने त्या तलवारी नांदेड येथे पाठवण्यात आल्याचे उघड झाले होते. यानंतर पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस या धाडी टाकत आहेत. (Ten swords seized again in Nanded, one accused arrested)

दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन निघाल्याने नांदेड पोलीस अॅक्शन मोडवर

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड शहरासह जिल्हाभरात पोलिसांचे जोरदारपणे धाडसत्र सुरू आहे. त्यानंतर हरियाणा येथे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन निघाल्याने नांदेड पोलीस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. रेकॉर्डवर असलेल्या सगळ्याच आरोपीच्या घराची तपासणी मोहीम सध्या सुरू आहे. रविवारी गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलिसांनी शहरातील दशमेश फायनान्स या दुकानावर धाड टाकली. या धाडीत 10 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपीने ह्या तलवारी कुठून आणि कशासाठी आणल्या याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सांगितले. (Ten swords seized again in Nanded, one accused arrested)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें