झाडं तोडल्याने तीन भावांना 14 दिवसांची कोठडी, महाराष्ट्रातील कोर्टाचा मोठा निर्णय

झाडं तोडल्याप्रकरणी तीन भावांना महाराष्ट्रातील कोर्टाने तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 60 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नंदुरबारमधील नवापूर कोर्टाने हा दणका दिला आहे.

झाडं तोडल्याने तीन भावांना 14 दिवसांची कोठडी, महाराष्ट्रातील कोर्टाचा मोठा निर्णय
Tree cutting Nandurbar

जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी,  नंदुरबार : झाडं तोडल्याप्रकरणी तीन भावांना महाराष्ट्रातील कोर्टाने तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 60 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नंदुरबारमधील नवापूर कोर्टाने हा दणका दिला आहे. आरोपी तीन भावांनी नवापूर तालुक्यातील प्रतापपूर जंगलात सागवान आणि कुडी जातीची 60 झाडं तोडली होती. याप्रकरणी नवापूर वन विभागाने गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने तिघांना 14 दिवसांची कोठडी सुनावली. (Three brothers remanded in custody for 14 days for Cutting trees In Nandurbar Maharashtra )

जंगलातील सागवान आणि कुडी जातीचे अवैधरित्या वृक्ष कत्तल केल्याने 17 हजारांचे नुकसान झाले आहे. संशयित आरोपी विलास गावीत, प्रवीण गावीत,अरविंद गावीत रा.बोरझर यांना त्यांचा राहत्या घराजवळून अटक करण्यात आली. त्यांचाविरोधात वन कायदेअंतर्गत गुन्हा नोंद केला. वनपाल बोरझर यांनी तिन्ही आरोपींना नवापूर न्यायालय येथे हजर केले.

काय आहे नेमकं प्रकरण? 

आरोपी तीन भाऊ विलास, प्रवीण आणि अरविंद गावीत हे तीन भाऊ हे नवापूर तालुक्यातील बोरझर गावात राहतात.  मात्र या भावांनी जवळच्या जंगलात मोठी वृक्षतोड केली. या तिघांनी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 60 झाडं तोडली. सागवान आणि कुडी या जातीची ही झाडं होती. सागवानाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या झाडांची कत्तल या तिघा भावांनी केली.

याबाबतची कुणकुण वन विभागाला लागली. वन विभागाने धडक कारवाई करुन तिघा भावांवर गुन्हा दाखल केला. पुढे त्यांना कोर्टात दाखल केल्यानंतर, कोर्टाने तिन्ही भावांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवलं.

संबंधित बातम्या  

राज्यपाल म्हणाले, फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, आता उद्धव ठाकरेंचं रोखठोक पत्र

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI