आजीच्या दशक्रिया विधीला आले, नदीत अंघोळीसाठी उतरताच भोवऱ्यात अडकले, 2 भावांचा मृत्यू

आपल्या आजीच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी कुटुंबासोबत नदीवर गेलेल्या दोन सख्ख्या नातवांचा नदीवर आंघोळ करताना बुडून मृत्यू झाला.

आजीच्या दशक्रिया विधीला आले, नदीत अंघोळीसाठी उतरताच भोवऱ्यात अडकले, 2 भावांचा मृत्यू
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 6:07 PM

अमरावती : आपल्या आजीच्या दशक्रिया विधीसाठी नदीवर गेलेल्या दोन सख्ख्या नातवांचा अंघोळ करताना बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी या गावामध्ये घडली. मनीष टोपमे आणि ईश्वर टोपमे असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत. या दोन्ही तरुणांच्या आजीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. (Two young boy form Amravati district drowned in river while bath who went for grandmother Dashkriya Vidhi)

दोघेही भाऊ पाण्याच्या भोवऱ्यात अडकले

मृत तरुणांच्या आजीचे निधन झाल्यामुळे आज (31 जुलै) दशक्रिया विधीचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नदीकाठी असलेल्या मंदिर परिसरात सर्व विधी सुरु होता. यावेळी नातू मनीष आणि ईश्वर टोमपे हे दोघेही नदीत आंघोळीसाठी गेले. दरम्यान नदीला जास्त पाणी असल्याने हे दोघेही भाऊ घाबरले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच दोघेही नदीतील पाण्याच्या भोवऱ्यात आडकले आणि त्यांचा मृत्यू झाला.

टोपमे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

यावेळी नातेवाईकांनी नदीत उतरून या दोघांनाही वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने या दोघांचाही मृत्यू झाला. एकीकडे दहा दिवसांपूर्वी आजीचा मृत्यू आणि त्यातच आता दोन तरुण मुलांवर काळाने घाला घातल्याने टोपमे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकारामुळे खानापूर गवळी गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी नद्या, नाले तसेच ओढे भरल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.  शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील सावंगी येथे 26 जुलै रोजी घडली होती. हे युवक सावंगी येथील शेतात फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर शेततळ्यात पोहताना पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मोहंमद अरसलाम नियाजी आणि शेख साजिद शेख याकूब असे मृतांचे नाव होते.

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे युवक पाण्यात बुडाले

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सावंगी येथे दोन युवक एका शेतात गेले होते. शेतात शेततळे पाहून या युवाकांनी पाण्यात पोहण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर हे दोन्ही युवक पाण्यात पोहोयला लागले होते. यादरम्यान पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोघेसुद्धा पाण्यात बुडाले होते.

इतर बातम्या :

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

Kamal Sadanah | पत्नी-मुलीची हत्या करुन निर्मात्याने संपवलं होतं कुटुंब, गोळीबारातून वाचलेला तरुण झाला बेखुदी सिनेमाचा हिरो, वाचा रिअल लाईफ ट्रॅजेडी

Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?

(Two young boy form Amravati district drowned in river while bath who went for grandmother Dashkriya Vidhi)