शेततळ्यात दोघे पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृ्त्यू, औरंगाबाद हळहळलं

शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सावंगी येथे घडली. सावंगी येथील शेतात फिरण्यासाठी गेल्यानंतर शेततळ्यात पोहताना पाण्यात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शेततळ्यात दोघे पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृ्त्यू, औरंगाबाद हळहळलं
young men drowned

औरंगाबाद : शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सावंगी येथे घडली. हे युवक सावंगी येथील शेतात फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर शेततळ्यात पोहताना पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहंमद अरसलाम नियाजी आणि शेख साजिद शेख याकूब असे मृतांचे नाव आहे. (Two young boy drowned while swimming at Sawangi Aurangabad)

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे युवक पाण्यात बुडाले

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सावंगी येथे दोन युवक एका शेतात गेले होते. शेतात शेततळे पाहून या युवाकांनी पाण्यात पोहण्याचं ठरवलं. त्यानंतर हे दोन्ही युवक पाण्यात पोहोयला लागले. यादरम्यान पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोघेसुद्धा पाण्यात बुडाले. तसेच आसपास कोणीही नसल्यामुळे त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण

ही घटना घडल्यानंतर दोन्ही तरुणांना पाण्यातून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिकांना मृतदेह सापडत नव्हते. त्यानंतर येथे अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या जवानांनी मृत दोन्ही युवकांना तळ्यातून बाहेर काढले. औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यात बुडून मृत्यू होण्याची मालिका सुरुच आहे. येथे एका आठवड्यात आतापर्यंत आठ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृत्यूसत्रामुळे सगळीकडे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रेकिंगदरम्यान तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

दरम्यान, औरंगाबादेत सध्या मोठा पाऊस झाल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली आहे. पर्यटकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी लोक बेत आखत आहेत. औरंगाबाद येथील सातारा डोंगरात 18 जुलै रोजी ट्रेकिंक करायला एकूण सात मित्र गेले होते. हे सातही जण डोंगर परिसरताली तलावात गेले होते. मात्र, यावेळी तलावात बुडून एकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेत इतर सहा जण सुदैवाने बचावले होते. लखन ईश्वर पवार वय-19 (रा.शिव शंकर कॉलोनी,औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात होती.

इतर बातम्या :

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश, गुंगीचे भस्म देऊन लूट, दोन भोंदूबाबांना अटक

Video | बिअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा औरंगाबादेत अपघात, लुटीसाठी लोकांची गर्दी

VIDEO | औरंगाबादेत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, लहान मुलाच्या पायाचा लचका तोडला

(Two young boy drowned while swimming at Sawangi Aurangabad)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI