संजयकाकांनी मला बळजबरीने निवडणुकीला उभं केलं आणि त्यांनीच पाडलं; भाजपच्या माजी आमदाराचा आरोप

Vilas Jagtap | मी झकमारी केलो आणि त्यांचं ऐकून निवडणुकीला उभा राहिलो. संजय पाटील सारखी खोटे बोलणारे अनेक लोक आपल्याला आयुष्यात भेटतात अशा फसवणाऱ्या लोकांच्या पासून सावधान रहा.

संजयकाकांनी मला बळजबरीने निवडणुकीला उभं केलं आणि त्यांनीच पाडलं; भाजपच्या माजी आमदाराचा आरोप
संजयकाका पाटील आणि विलासराव जगताप

सांगली: संजय काका पाटील यांच्यासारखा घातकी मित्र आयुष्यात कधीही कोणाच्या वाट्याला येऊ नये. 2019 साली संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांनीच मला बळजबरीने निवडणुकीला उभे केले आणि त्यांनीच मला पाडले, असा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार विलास जगताप यांनी केला.

ते शनिवारी जत तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विलास जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली. संजय काका पाटील हे फसवणारे नेते आहेत. माझी इच्छा नसताना 2019 ला त्यांनी मला पुन्हा निवडणुकीला उभा राहण्यास सांगितलं. मात्र, मला पाडायला सुद्धा त्यांनीच षडयंत्र केलं. मी झकमारी केलो आणि त्यांचं ऐकून निवडणुकीला उभा राहिलो. संजय पाटील सारखी खोटे बोलणारे अनेक लोक आपल्याला आयुष्यात भेटतात अशा फसवणाऱ्या लोकांच्या पासून सावधान रहा. जत तालुक्यातील या गावात विलासराव जगताप यांनी खासदार संजयकाका यांच्यावर तोफ डागली.

संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र. पण संजय पाटील यांच्यासारखा घातकी मित्र आयुष्यात कधी कोणाला मिळू नये. माणसाच्या मागे किती मतं आहेत, हे महत्त्वाचे नाही. परंतु, त्या माणसाचे विचार कसे आहेत, हे महत्त्वाचं असतं. जय-पराजय कोणाचे होत नाही, मी सुद्धा दोनदा पराभूत झालो आणि एकदा आमदार झालो. मला पण काम करायची संधी मिळाली. पण संजयकाका पाटील यांच्यासारख्या घातकी मित्रांपासून सावध राहणे हे फार गरजेचे असल्याचे विलास जगताप यांनी म्हटले.

सांगलीत भाजपकडून संजयकाकांना सर्वाधिकार बहाल

मध्यंतरी सांगली महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चा भाजपने चांगलीच धास्ती घेतली होती. त्यानंतर सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी भाजप खासदार संजयकाका पाटील यांना सर्वाधिकार देण्यात आले होते.

कोण आहेत संजय काका पाटील?

2014 साली संजयकाका पाटील भाजपमधून लोकसभेवर 2 लाख 38 हजार मतांनी निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव केला होता. संजयकाका पाटील दिवंगत आर आर पाटील यांच्या नेतृत्वाच सांगलीमध्ये काम करत होते. मात्र 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. दिवंगत आरआर आबांचे ते पक्षांअंतर्गत शत्रू मानले जात होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

  • संजय काका पाटील सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
  • 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले आहेत
  • बेधडक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे
  • संजयकाका पाटील यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली.
  • काँग्रेसमधून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून ते विधानपरिषदेचे आमदार झाले
  • पुढे राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं.

संबंधित बातम्या:

संजयकाका म्हणाले, नको नको नको, जयंत पाटलांनी आग्रहाने शेजारी बसवलं

Sangli | सांगलीत जयंत पाटील-संजयकाका पाटील एकाच मंचावर

‘जुन्या मित्रांची यारी, राजकारणातली दुनियादारी’, भाजप खासदार संजयकाका पाटलांच्या मनात नेमकं काय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI