बाडगा असतो तो कोडगा असतो; विनायक राऊतांची राणेंवर शेलक्या भाषेत टीका

विनायक राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी बोलत होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना भाजपमध्ये घेऊ असं नारायण राणे म्हणाले होते. राणेंच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत यांनी हा हल्ला चढवला आहे. (vinayak raut)

बाडगा असतो तो कोडगा असतो; विनायक राऊतांची राणेंवर शेलक्या भाषेत टीका
vinayak raut

रत्नागिरी: शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. बाडगा असतो तो कोडगा असतो. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजपने बुजगावणे पुढे केले आहे, असा घणाघाती हल्ला विनायक राऊत यांनी चढवला आहे. (vinayak raut slams narayan rane over jan ashirwad yatra)

विनायक राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी बोलत होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना भाजपमध्ये घेऊ असं नारायण राणे म्हणाले होते. राणेंच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत यांनी हा हल्ला चढवला आहे. बाडगा जो असतो तो कोडगा असतो. भाजपने शिवसेनेवर टीका करण्यासाठी नारायण राणेंचे बुजगावणे पुढे केलं आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यास सांगितलं. परंतु, पंतप्रधानाच्या या आवाहनाला राणेंनी हरताळ फासला. जन आशीर्वाद यात्रेतून राणेंनी लोकांचे किती प्रश्न समजवून घेतले?, असा सवाल राऊत यांनी केला.

राणेंना ठोकम ठोकीची सवय

स्वार्थासाठी शिवसेनेशी बेईमानी केलेल्या राणेंना इतर सुद्धा तसेच दिसतात. याच भावनेमुळे एकनाथ शिंदेवर राणेंनी आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिंदे मंत्रीपदाला न्याय देत आहेत. पक्ष संघटना सुद्धा मजबुत करण्याचे काम करतआ आहेत, असं सांगतानाच स्वतःच्या अनुभवावरून इतरांना मोजणे हा नारायण राणेंचा गुणधर्म असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. राणेंना ठोकम ठोकी करायची सवयच आहे. शिंदे शिवसेनेसाठी अभिमान असणारे मंत्री आहेत, असं गौरवोद्गारही त्यांनी काढलं. जिल्हा नियोजनाची बैठक दहा दिवस आगोदर जाहीर केली आहे. नारायण राणेंना काटशह देण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. तसेच कोकणात येणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना गांभिर्याने घेत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

राणे तिसरी लाट आणणार

राणेंची जन आशीर्वाद यात्रा सोमवारी रत्नागिरीत दाखल होत आहे. यावेळी राणे शक्ती प्रदर्शन करतील. त्याचाही राऊतांनी समाचार घेतला. ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन येत आहेत. कोकणवासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.

दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना केली. यावेळी दानवेंनी पंतप्रधान मोदी यांना बैल म्हटले तर राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. यावरून पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलंय. भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याला सांड म्हणन म्हणजेच दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं लक्षण आहे, अशी टीका त्यांनी केली. दानवे यांची बुद्धी नेहमीच भ्रष्ट झालेली असते. त्याची दखल नरेंद्र मोदी यांनी घ्यावी. मोदी यांना बैल म्हणणे म्हणजे त्यांचा अवमान करण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (vinayak raut slams narayan rane over jan ashirwad yatra)

 

संबंधित बातम्या:

‘नारायण राणेंना पब्लिसिटी स्टंटचा मोह आवरला नाही, लोकांचं आरोग्य वेठीस धरलं’

परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्याने कोरोना आला, पूर आला; विश्वजीत कदम यांचं तर्कट

आपण निसर्गाशी खेळ केला म्हणूनच बिबट्या, मगरींचा शहरात संचार; जयंत पाटलांनी दिला सावधानतेचा इशारा

(vinayak raut slams narayan rane over jan ashirwad yatra)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI