Akola Crime | अकोल्यात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; क्लासच्या संचालकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा, वसीम चौधरीला 26 पर्यंत पीसीआर

तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सिव्हिल लाईन्स पोलीस करीत आहेत. हे प्रकरण चालविण्यासाठी उज्ज्वल निकम यांची मागणी करणार आहेत. वासीम चौधरी विरोधात आमदार नितीन देशमुख हे गृहमंत्री यांना भेटणार आहेत. अशी माहिती सिव्हिल लाईन्सचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.

Akola Crime | अकोल्यात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; क्लासच्या संचालकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा, वसीम चौधरीला 26 पर्यंत पीसीआर
वसीम चौधरी ला 26 पर्यंत पीसीआरImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 9:28 AM

अकोला : वसीम चौधरी (Wasim Chaudhary) यांच्याविरुद्ध रविवारी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 354 सह पोस्को व आयटी ॲक्टनुसार (IT Act) गुन्हा नोंदवून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी वसीम चौधरी यांना अटक केली. चौधरी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 मेपर्यंत पोलीस कोठडी (PCR) दिली आहे. अकोला शहरातल्या तोषणीवल लेआउट येथील कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्या विरुद्ध रविवारी सायंकाळी सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार वसीम चौधरी यांनी मुलीसोबत मोबाईलवरून अश्लील चॅटिंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला खोलीवर बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घाबरलेल्या मुलीने ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांसोबत थेट सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन गाठून वसीम चौधरी विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. यावेळी पोलीस स्टेशनला मोठ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाईलवर अश्लील संवाद

पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भादंवि कलम 354 (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, 10 अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लील चॅटिंग करणे आदी गुन्हे दाखल केले. सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी आरोपी वसीम चौधरीला अटक केली आहे.

तपास सायबर पोलिसांकडे

पुढील तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सिव्हिल लाईन्स पोलीस करीत आहेत. हे प्रकरण चालविण्यासाठी उज्ज्वल निकम यांची मागणी करणार आहेत. वासीम चौधरी विरोधात आमदार नितीन देशमुख हे गृहमंत्री यांना भेटणार आहेत. अशी माहिती सिव्हिल लाईन्सचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली. तर, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख हे हे प्रकरण चालविण्यासाठी उज्ज्व निकम यांना सरकारी वकील ठेवावे, यासाठी गृहमंत्र्यांना विनंती करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.