Chandrapur | पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले, जनविकास सेना उद्या काढणार धिक्कार मोर्चा

मनपातील भाजप सत्ताधाऱ्यांनी चंद्रपूरकरांना एप्रिल फुल केलंय. कंत्राटदाराला 200 कोटी रुपये देण्यात मनपानं लगीनघाई केली. 2 वर्षात पूर्ण होणारे काम साडेचार वर्षानंतरही अपूर्णच राहिले. अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम कधी पूर्ण होणार असा नागरिकांचा प्रश्न पडला. सलग 6 दिवस शहर तहानलेले असताना मनपाचा कारभार संथ आहे. 1 एप्रिलपासून जनविकास सेनेचे मनपा समोर धिक्कार आंदोलन करणार आहे.

Chandrapur | पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले, जनविकास सेना उद्या काढणार धिक्कार मोर्चा
चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनेसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 6:30 AM

चंद्रपूर : शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे (Amrut Water Supply Scheme) काम कार्यारंभ आदेशानुसार दोन वर्षात पूर्ण करायचे होते. मात्र साडेचार वर्षाचा कालावधी होऊनही काम अपूर्णच आहे. या योजनेसाठी खोदकाम केल्याने डागडुजी अद्यापही केली नाही. परिणामी शहरातील नागरिकांना खड्ड्यांच्या व धुळीच्या त्रासाला समोर जावे लागत आहे. असे असतानाही, मनपाने कंत्राटदाराला दोनशे कोटी रुपयांची देयके देण्याची लगीनघाई केली. गेले 6 दिवस शहर जलवाहिनी दुरुस्तीच्या नावावर तहानलेले असताना नागरिकांचा संताप दिसून येत आहे. शहरातील चार लाख नागरिकांना मनपाने एप्रिल फुल बनविले, असा आरोप करीत मनपा सत्ताधाऱ्यांविरोधात एक एप्रिलपासून गांधी चौकात मनपासमोर धिक्कार आंदोलन करण्याचा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष (Janvikas Sena President) तथा नगरसेवक पप्पू देशमुख (Corporator Pappu Deshmukh ) यांनी दिलाय.

कंत्राटदारासोबत सत्ताधारी पक्षाचे लागेबांधे

चंद्रपूर मनपाने 2017 मध्ये केंद्र सरकार पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश दिला. त्यानुसार दोन वर्षाच्या आत म्हणजेच 2019 पर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र साडेचार वर्षाचा कालावधी लोटूनही या योजनेचे काम अपूर्णच आहे. अमृत योजनेच्या कंत्राटदारासोबत सत्ताधारी पक्षाचे नेत्यांच्या लागेबांधे असल्यामुळे अमृत योजनेला विलंब होऊनही कंत्राटदाराचा बचाव करण्यात येत आहे. मे. संतोष एजन्सी या कंत्राटदाराने अमृत योजना पूर्ण करण्यास तीन वर्षापेक्षा जास्त विलंब लावला.

कारण नसताना मुदतवाढ का

कोरोना आपत्ती सुरू होण्याच्या एक वर्षापूर्वी अमृत योजनेचे काम होणे अपेक्षित होते. मात्र विलंब झाल्यानंतरही कंत्राटदाराला अभय देण्यात आले. यानंतर कोरोना आपत्तीचे कारण पुढे करून एकवेळा मुदतवाढ देण्यात आली. कोरोना नियम शिथिल झाल्यावर कोणतेही कारण नसताना कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. तीन वर्षे विलंब होऊनही कंत्राटदार विरुद्ध महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळेच मनपाच्या कारभारावर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

Amit Shaha In LS: मी असं विधेयक महाराष्ट्रासाठी आणू शकत नाही, केजरीवालांना उत्तर देताना शहांचा तीन राज्यांचा दाखला

Babanrao Lonikar Audio Clip : इन्कम टॅक्सच्या धाडी टाकीन, बबनराव लोणीकरांची इंजिनिअरला धमकी, भाजपची अडचण?

Babanrao Lonikar Audio Clip : माजलात का तुम्ही, बबनराव लोणीकरांचा तोल गेला; अभियंत्याला शिवीगाळ? ऑडिओ क्लिप व्हायरल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.