गावठी कट्टा कंबरेला बांधून गावभर फिरला, शेवटी पोलिसांनी दाखवला इंगा, तरुणाच्या मुसक्या आवळल्या

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 27, 2021 | 10:53 PM

गावात भर रस्त्यावर फिरत असल्यामुळे सगळीकडे दहशत माजली होती. हा प्रकार समजल्यावर पोलिसांनी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्याजवळ असलेले गावठी पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे.

गावठी कट्टा कंबरेला बांधून गावभर फिरला, शेवटी पोलिसांनी दाखवला इंगा, तरुणाच्या मुसक्या आवळल्या
गावठी कट्टा कंबरेला बांधून गावभर फिरला, शेवटी पोलिसांनी दाखवला इंगा, तरुणाच्या मुसक्या आवळल्या

Follow us on

लातूर : गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका युवकाला लातूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. हा तरुण लातूर जवळच्या भातांगळी गावातील रहिवासी आहे. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलं असलं तरी तो रस्त्याने गावठी कट्टा घेऊन का फिरत होता ? याची स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस याचा तपास करत आहेत. (young boy carrying pistol arrested by police in Bhatangali village of Latur district)

गावठी कट्टा घेऊन तरुण गावभर फिरला

मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहराच्या जवळच असलेल्या भातांगळी गावात एक तरुण कंबरेला गावठी कट्टा बांधून फिरत होता. गावात भर रस्त्यावर फिरत असल्यामुळे सगळीकडे दहशत माजली होती. हा प्रकार समजल्यावर पोलिसांनी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्याजवळ असलेले गावठी पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे. या कारवाईत पोलिसांना त्याच्याजवळ एक गावठी कट्टा तसेच इतर संशयास्पद साहित्य सापडलं आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केलंय.

तरुणाला नेमकं काय करायचं होतं ?  पोलिसांकडून तपास सुरु

पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर एकच चर्चा रंगली आहे. कंबरेला गावठी कट्टा बांधून हा तरुण नेमकं काय करु इच्छित होता ? हा प्रश्न विचारला जातोय. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

पिंपरी चिंचवडच्या वडगाव मावळमध्ये तरुणाला अटक

दरम्यान, अशीच एक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली. पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पुण्यातील मावळ भागात एका तरुणाला 4 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वडगाव मावळ येथे ही कारवाई केली होती. कुणाल बाबाजी हरपुडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वडगाव परिसरात पोलीस रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी कुणालचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे पिस्तुल आढळून आले होते.

इतर बातम्या

PHOTO | सारा अली खान करतेय लडाखमध्ये धमाल, सोशल मीडियावर फोटो शेअर

KBC 13 : 7 कोटीच्या प्रश्नापासून केवळ एक पाऊल दूर आहे अंध हिमानी बुंदेला, जाणून घ्या या पैशांबाबत काय आहे योजना

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI