VIDEO : नालासोपाऱ्यात तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

नालासोपारा पूर्वे प्रगती नगर येथे शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तुळिंज पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर एका आरोपीला अटक केली आहे.

VIDEO : नालासोपाऱ्यात तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
नालासोपाऱ्यात तरुणाला बेदम मारहाण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 3:01 PM

नालासोपारा : प्रेमसंबंधातून एका तरुणाला 5 ते 6 जणांनी लाकडी दांडका, फळी, ठोश्या बुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोनू पटेल असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. नालासोपारा पूर्वे प्रगती नगर येथे शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तुळिंज पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर एका आरोपीला अटक केली आहे. (Young man beaten in Nalasopara incident of beating captured on CCTV)

मुलगी घर सोडून सोनूच्या घरी गेल्याच्या संशयातून मारहाण

सोनू पटेल याची त्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीशी जवळीक वाढली होती. ही जवळीक मुलीच्या घरच्यांना पसंत नव्हती. एकदा मुलगी घर सोडून सोनूच्या घरी रहायला गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी मुलगी पुन्हा आपल्या घरी परतली. आता पुन्हा मुलगी घर सोडून गेल्यामुळे तिच्या घरच्यांना ती पुन्हा सोनू्च्या घरी गेल्याचा संशय आला. यातूनच सोनूला गाठून बेदम मारहाण केली. या मारहाणीच सोनू जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सोनूच्या तक्रारीवरुन तुळिंज पोलिसांनी 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. (Young man beaten in Nalasopara incident of beating captured on CCTV)

इतर बातम्या

Surat, Girl Murder : सुरतच्या ग्रीष्मा हत्याकांडावर लवकरच निर्णयाची शक्यता, 2 हजार पानांच्या आरोपपत्रात 190 साक्षीदारांचे जबाब

Nagpur Crime | नागपुरातून चोरायचे गाड्या, अमरावतीत नेऊन विकायचे; सात आरोपींना बेड्या