तिकीट जाहीर होण्याअगोदरच पद्मसिंह पाटलांनी उमेदवारी अर्ज घेतला

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने अजून उस्मानाबादचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातच उस्मानाबाद लोकसभेसाठी निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे . पद्मसिंह पाटील हे निवडणूक लढविणार नसल्याचं सांगितलं जात असतानाच त्यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने यावेळी राष्ट्रवादी पुन्हा एकदा डॉ. पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार का? अशी …

तिकीट जाहीर होण्याअगोदरच पद्मसिंह पाटलांनी उमेदवारी अर्ज घेतला

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने अजून उस्मानाबादचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातच उस्मानाबाद लोकसभेसाठी निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे . पद्मसिंह पाटील हे निवडणूक लढविणार नसल्याचं सांगितलं जात असतानाच त्यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने यावेळी राष्ट्रवादी पुन्हा एकदा डॉ. पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

उस्मानाबाद लोकसभेसाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मुलगा आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि सून अर्चना पाटील यापैकी एक संभाव्य उमेदवार अशी चर्चा सुरु होती. त्यातच डॉ. पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राष्ट्रवादीची व्यूहरचना स्पष्ट होत असल्याचं बोललं जात आहे. डॉ. पाटील यांच्यासाठी तेर येथील सोमनाथ मुळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. संभाव्य उमेदवार अशी चर्चा असलेले आमदार राणा आणि अर्चना पाटील यांनी अद्याप उमेदवारी अर्ज घेतलेले नाहीत. त्यांच्यापूर्वी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी अर्ज घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार प्रा. रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांच्यासाठी अॅड. जितेंद्र पाटील यांनी तब्बल 4 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. शिवसेनेतही अनेक इच्छुक उमेदवार असतानाही त्यापैकी एकानेही अद्याप अर्ज न घेतल्याने यंदा 2019 मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील अशी लढत होणार का? हे पाहावे लागेल.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशीही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. 19 मार्च आणि 20 मार्च या दोन दिववसात 30 जणांनी 59 अर्ज घेतले. 26 मार्च उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *