पाकिस्तानातील लोक शिकतायत मराठी, साताऱ्यातील क्लासची राज्यभरात चर्चा

साताऱ्यातील दिलीप पुराणिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या आपल्या मराठी बांधवांचा शोध घेतला आहे. | Satara

पाकिस्तानातील लोक शिकतायत मराठी, साताऱ्यातील क्लासची राज्यभरात चर्चा
पाकिस्तानात कराची मध्ये रेडिओ स्टेशन समोरच नारायण जगन्नाथ वैद्य यांच्या नावाने शाळा आहे. परंतु आता या शाळेत केवळ ऊर्दू आणि इंग्रजीचे धडे दिले जातात.
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 9:54 AM

सातारा: सातारा जिल्ह्याला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळख होती. अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजमाचीवरुन निघालेल्या आदेशाची अंमलबजावणी सातासमुद्र अटकेपार व्हायची असे म्हटले जायचे आतादेखील या राजधानीतून एक कुटुंब पाकिस्तान मधील मराठी लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी धडपड करत आहे. विशेष म्हणजे काल 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा झाला. हाच मराठी भाषा दिन आज 28 फेब्रुवारीला दिलीप पुराणीक यांच्या कुटुंबाने पाकिस्तानातील कराची येथील मराठी बांधवांसोबत साजरा केला. (Satara Online Marathi classes for Pakistani peoples)

साताऱ्यातील दिलीप पुराणिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या आपल्या मराठी बांधवांचा शोध घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरी बसून नवनवीन संकल्पना राबवल्या पण दिलीप पुराणिक यांनी चक्क पाकिस्तान मध्ये राहत असणाऱ्या तब्बल 500 मराठी कुटुंब शोधून काढली आणि मग प्रवास सुरु झाला मराठी भाषा शिकवण्याचा.

काल 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा करण्यात आला हाच मराठी भाषा दिन दिलीप पुराणिक यांनी कराची येथील मराठी बांधवासोबत ऑनलाईन साजरा केला आहे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन खासदार अमोल कोल्हे आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या उपस्थित राहिले होते यावेळी पाकिस्तान मधील मराठी बांधवांचा नेमका काय इतिहास आहे हे अमोल कोल्हे यांनी कराची येथील मराठी बांधवांकडून जाणुन घेतले.

पाकिस्तानातील बांधवांना मराठी भाषेची गोडी

पुराणीक कुटुंबीयांनी इंटरनेटच्या मदतीने झूम मिटिंग द्वारे दर रविवारी मराठीची ऑनलाइन शिकवणी सुरु केली होती. आता या मोहिमेला मोठे यश मिळताना पाहायला मिळत आहे.पाकिस्तान मधील बऱ्याच कुटुंबियांना मराठी भाषा शिकायची इच्छा आहे.त्यांची ही इच्छा आता हे पुराणिक कुटुंबीय पूर्ण करत आहेत. इंटरनेटवर दर रविवारी ऑनलाइन क्लासेस घेतले जातात. या क्लासेसला पाकिस्तानातील मराठी लोकांचं कुटुंब आता येऊ लागलं आहे. आता या लोकांना आपला मराठी इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा इतिहास शिकवला जाऊ लागला आहे. मुळातच पाकिस्तानमधील मराठी बांधवांनाही आपल्या भाषेविषयी प्रेम आणि आस्था आहे.

त्यामुळेच त्यांची मराठी शिकण्याची धडपड स्पष्ट दिसत आहे.पाकिस्तानात कराची मध्ये रेडिओ स्टेशन समोरच नारायण जगन्नाथ वैद्य यांच्या नावाने शाळा आहे. परंतु आता या शाळेत केवळ ऊर्दू आणि इंग्रजीचे धडे दिले जातात. या शाळेला नाव फक्त मराठी माणसाचे राहिले आहे. तिथे असणाऱ्या मराठा बांधवांच्या मध्ये धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्या खालोखाल मराठा आणि पोतराज समाजाची लोक तिथे वास्तव्य करतात. त्यामुळे आता मराठ्यांच्या राजधानीतून थेट पाकिस्तानात पुराणिक कुटुंबातील व्यक्तींच्या कडून मराठी भाषेचे दिले जाणारे धडे हे चर्चेचा विषय ठरले आहेत.

(Satara Online Marathi classes for Pakistani peoples)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.