AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेत जीन्स घालणाऱ्या पालघरच्या पाच शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

पाच शिक्षक जीन्स परिधान करुन शाळेत आल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (Palghar Teachers notice Jeans)

शाळेत जीन्स घालणाऱ्या पालघरच्या पाच शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
| Updated on: Feb 01, 2021 | 4:23 PM
Share

पालघर : शाळेत जीन्स घालून आलेल्या पालघरच्या पाच शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विक्रमगड तालुक्यातील शिक्षण विभागाच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाच गुरुजींना नोटीस देऊन खुलासा करण्यास सांगितले आहे. (Palghar Teachers get notice for wearing Jeans in School)

शासनाच्या नवीन जीआरनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना शोभनीय पेहराव घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु पाच शिक्षक जीन्स परिधान करुन शाळेत आल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील पंचायत समिती विक्रमगडच्या शिक्षण विभागाच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. दोन दिवसात कार्यालयास आपला खुलासा सादर करण्याचे आदेश त्यांना नोटीशीत देण्यात आले आहेत.

नोटिशीत काय?

“शासन परिपत्रकानुसार सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्याला शोभनीय असावा. याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पोशाखा परिधानाबाबत सविस्तर नमूद करण्यात आले आहे. यामध्ये जीन्स पँट परिधान न करणे, याबाबत स्वयंस्पष्ट उल्लेख असतानासुद्धा तुम्ही शालेय वेळेत जीन्स परिधान करुन येण्याचे प्रयोजन काय?” असा सवाल नोटिशीत विचारण्यात आला आहे.

नोटीस मिळताच लेखी खुलासा दोन दिवसात पंचायत समिती कार्यालयात करावा, अन्यथा तुमचे काहीही म्हणणे नाही असे गृहित धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.

जीन्स-टीशर्ट चर्चेत का?

महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार आता सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहेत. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे, याबाबत महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलं आहे. ज्यामध्ये ड्रेस कसा असावा, कुणी कुठले कपडे घालावेत, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

सरकारची भावना काय?

सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलावा ही भावना सरकारची आहे. कपड्यांवरुन सरकारी कर्मचारी ओळखला जावा आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला जबाबदार व्यक्ती समजलं जावं, यासाठी हा बदल केल्याचं बोललं जातं. आता सरकारने कर्मचाऱ्यांची वेशभूषा बदलली असली, तरी त्यांची काम करण्याची पद्धत मात्र तीच राहणार आहे. ज्या पद्धतीचा त्रास नागरिकांना सर्वाधिक होतो, ती पद्धत बदलण्यासाठी सरकारने काही तरी ठोस उपाय करणं गरजेचं आहे, तरच कपड्यांसोबत बदललेला सरकारी कर्मचारीही व्यवस्था बदलाचा भाग होईल, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

काय आहेत सूचना?

  • गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करु नयेत
  • अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयात करु नये
  • कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावेत
  • महिलांनी साडी, सलवार, कुर्ता, शर्ट आणि ट्राऊझर्स वापरावेत
  • (Palghar Teachers get notice for wearing Jeans in School)

पादत्राणांविषयी नियमावली

  • स्लीपर घालण्यासही सरकारी कार्यालयात परवानगी नाही
  • महिला कर्मचाऱ्यांनी चप्पल, सँडल, शूज वापरावेत
  • पुरुष कर्मचाऱ्यांनी शक्यतो शूज किंवा सँडल वापरावी
  • कार्यालयात स्लीपरचा वापर करु नये

संबंधित बातम्या :

सरकारचा आदेश जारी; आता एकाच गणवेशात अधिकारी आणि कर्मचारी

“ते जीन्स पँटचं चुकीचं झालं, पण…” अजित पवार यांचं सरकारी ड्रेसकोडवर भाष्य

(Palghar Teachers get notice for wearing Jeans in School)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.