मागच्या वेळी आलो होतो, तेव्हा संध्याकाळी…; पालघरच्या सभेत योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

Uttar Pradesh CM Yogi Adityanath on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये महायुतीची सभा झाली. या सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाषण केलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा सविस्तर...

मागच्या वेळी आलो होतो, तेव्हा संध्याकाळी...; पालघरच्या सभेत योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 7:54 PM

पाचव्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. पालघरमध्येही आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली.यावेळी राम मंदिरच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं. मागच्या वेळी मी आलो होतो, तेव्हा संध्याकाळी आलो होतो. आता मी लोकसभा निवडणुकीसाठी दुपारी आलो आहे. मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा काँग्रेसचा सूर्यास्त करण्यासाठी आलो होतो. राम मंदिर नरेंद्र मोदी यांनी बनवलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय म्हणायचे 100 जन्म घेतले तरी मंदिर बनवणार नाही. पण आम्ही जे बोललो ते करून दाखवतो. आम्ही राम मंदिर बांधून दाखवलं आहे.

काँग्रेसवर टीका

काँग्रेसचं सरकार आलं तर राम मंदिरचे काय करायचे हे आम्ही ठरवू असं ते म्हणतात. पण रामलल्ला तुम्हाला दिल्लीत पोहचवू देणार नाही. कोर्टाचा निर्णय आला तर दंगली होतील असं हे त्यावेळी सांगायचे. आता निर्णय आला आणि राम मंदिर देखील झालं. पण एक दंगल देखील झाली नाही. उत्तर प्रदेश मध्ये मागच्या सात वर्षात एक दंगल देखील झाली नाही. आम्ही मोठ मोठ्या माफियांचा राम नाम सत्य है करतो… मी बुलडोझर चालवून एका दिवसात माफिया संपवून टाकलं, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

काश्मीर प्रश्वावर योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

उत्तर प्रदेशमध्ये कुणी रस्त्यावर नमाज पण पडत नाही. आता आतंकवाद कुठे दिसत नाही. एखादा फटाका फुटला तरी पाकिस्तान म्हणत यात आमचा हात नाही. भारत कुणाला छेडत नाही आणि छेडलं तर कुणाला सोडत नाही. पुढच्या काळात पाक व्याप्त काश्मीर भारताचा भाग असेल. हे सगळं करण्यासाठी हिंमत लागते. ही काँग्रेसमध्ये नाही. तर ती भाजप आहे. आम्ही आतंवाद्यांना सोडत नाही. जो भारताकडे वाकड्या नजरेने बघेल त्याचे डोळे जागेवर राहणार नाही, असंही योगी आदित्यनाथ म्हटलं.

महाराष्ट्र राज्यात मोठा विकास झाला. नितीन गडकरींनी चांगलं काम केलं आहे. वंदे भारत, मेट्रो, सर्व काही झालं आहे. अयोध्ये नंतर आज मथुरेचं स्वप्न देखील आम्ही पूर्ण करू. आमचे कृष्ण कन्हैय्या तरी कसे शांत राहतील. देशात राम भक्त राज्य करणार की राम द्रोही हे तुम्ही ठरवा. मोदीजी राम भक्त आहेत. मोदी सरकारच्या काळात लोकांना आरोग्यासाठी योग्य सुविधा मिळत आहेत. 80 करोड लोकांना मोफत रेशन मोदी देत आहेत, असं योगी आदित्यनाथ पालघरच्या सभेत म्हणाले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.