Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात

नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी मंगळवारी, 21 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत.

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात
Election
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 9:49 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 59 उमेदवारांनी अर्ज भरले होते. यातील 21 अर्ज बाद झाले असून, आता 38 उमेदवार रिंगणात आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून निवडणूक होत आहे.

येथे अर्ज बाद

नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, कळवण आणि दिंडोरी नगरपंचायीतील या जागा आहेत. त्यात देवळ्यातील 4 जागांसाठी 27 अर्ज होते. येथे सर्वाधिक 11 अर्ज बाद झाले. निफाडमधील 3 जागांसाठी 14 अर्ज आले होते. येथे 6 अर्ज बाद झाले. दिंडोरी व कळवणमध्ये प्रत्येकी 2 जागांसाठी अनुक्रमे 12 व 6 अर्ज आले होते. येथे कळवणध्ये एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. या उमेदवारांना 10 जानेवारी दुपारी 3 पर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

दोन टप्प्यांत मतदान

नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी मंगळवारी, 21 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान झाले. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे.

8 जानेवारी रोजी मतदान

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून निवडणूक होत आहे. या जागांचे 18 जानेवारी रोजी मतदान होईल आणि निकाल मात्र 19 जानेवारी रोजी लागेल. दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे.

उत्सुकता शिगेला

पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होतेय. आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

इतर बातम्याः

Nashik Corona|नाशिकरांसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे…राज्याच्या आरोग्य सचिवांचा काय आहे इशारा?

Nashik| लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न मार्गी; भुजबळांच्या प्रयत्नातून 17 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.