पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना वाढतोय! रॅपिड आणि RTPCR चाचण्यांवर भर, गावोगाव कॅम्प भरवले जाणार

पंढरपूर प्रशासनानं खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शहरात आणि तालुक्यातील गावोगावी रॅपिड आणि RTPCR चाचणीचे कॅम्प भरवले जाणार असल्याची माहिती पंढरपूर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेतलाय.

पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना वाढतोय! रॅपिड आणि RTPCR चाचण्यांवर भर, गावोगाव कॅम्प भरवले जाणार
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो


पंढरपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र दिसत असलं तरी काही जिल्हे आणि तालुक्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसून येत आहे. आषाढी वारी झाल्यानंतर आता पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पंढरपूर प्रशासनानं खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शहरात आणि तालुक्यातील गावोगावी रॅपिड आणि RTPCR चाचणीचे कॅम्प भरवले जाणार असल्याची माहिती पंढरपूर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेतलाय. (Corona outbreak in Pandharpur city and taluka, village camps will be set up for testing)

पंढरपूर शहर आणि तालुक्यात आज दिवसभरात जवळपास 3 हजार 600 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 128 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरमध्ये कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे पंढरपूर पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूरमध्ये काल 152 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंत आज प्रशासनानं शहर आणि ग्रामीण भागात कोरोना चाचण्या घेतल्या. त्यात तुंगत, कासेगाव, गादेगाव यासह वाखरी आणि अन्य गावांचा समावेश होता.

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात

आज एकूण 3 हजार 527 रॅपिड चाचण्या, तर 54 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची एकूण संख्या 3 हजार 581 होती. त्यातील 128 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पंढरपुरातील आजचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर 3.57 टक्के असल्याचं प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून येत आहेत. तालुक्यात आजपर्यंत 28 हजार 729 रूग्ण आढळून आले आहेत. 539 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंढरपूरमध्ये सध्या 799 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 27 हजार 391 रुग्ण पूर्णपणे बरे होवून घरी परतले आहेत.

11 जिल्ह्यांमध्ये ब्रेक द चैनच्या तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध

महाराष्ट्रातील 11 जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं, सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

कारण काय?

या अकरा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण अधिक आहेत. कोरोना संक्रमणाचा दर अधिक आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि अहमदनगरमध्ये नव्या केसेस मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे या अकरा जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लावण्याचा निर्णय झाला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Unlock : 22 जिल्ह्यातले निर्बंध हटवले, नवी नियमावली जारी, काय सुरु, काय बंद? वाचा एका क्लिकवर

राज्यातील 11 जिल्ह्यांवर लॉकडाऊनचं संकट?, कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता

Corona outbreak in Pandharpur city and taluka, village camps will be set up for testing

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI