AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम, पोलिसांची नोटीस, पंढरपुरात घडामोडींना वेग..

आमदार रोहित पवार आज पंढरपुरमध्ये आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांच्या अन्नत्याग आंदोलनापूर्वीच त्यांना पोलिसांनी नोटीस दिली. शिवाजी महाराज चौकातील वाहतूक व्यवस्थेचे कारण दाखवत त्यांनी ही नोटीस दिली. मात्र, रोहित पवार आंदोलनावर ठाम आहेत.

रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम, पोलिसांची नोटीस, पंढरपुरात घडामोडींना वेग..
MLA Rohit Pawar
| Updated on: Jun 12, 2026 | 10:15 AM
Share

आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसत आहेत. अन्नत्याग आंदोलन रोहित पवार यांच्याकडून केले जातंय. रोहित पवार यांच्या या आंदोलनाला काही वेळातच सुरूवात होईल. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नाही. आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा निरोप जिल्ह्यातील शरद पवार पक्षाच्या आमदारांना नाहीये. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात विसंवाद पुढे येतोय. आमदार उत्तम जानकर आणि आमदार अभिजीत पाटलांना आंदोलनाची कोणत्याही प्रकारची माहिती नाहीये. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पंढरपुरात आमदार रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन होतंय. सोलापूर जिल्ह्यात शरद पवार पक्षाचे चार आमदार आणि एक खासदार आहे. आमदारांना निरोप नसल्याची थेट 2 आमदारांनी कबुली देखील दिली. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नाही.

आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून आमदार रोहित पवारांना नोटीस देण्यात आली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि शिवाजी महाराज चौकातील वाहतूक व्यवस्थेचे कारण दाखवत पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली. पालिकेने इतर मोकळ्या जागेत आंदोलन करण्याचे सुचवले होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आंदोलनावरून नोटीस देण्यात आली.

ही नोटीस आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनापूर्वी पोलिसांकडून देण्यात आली. यादरम्यानच रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. रोहित पवार यांनी लिहिले की, विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय…

त्यामुळे अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही. सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो, हे सरकारने लक्षात ठेवावं. उलट लढणाऱ्याचे हात धरुन आणि बोलणाऱ्याचं तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय. पण एक मात्र खरंय, की सरकारच्या दबावामुळं जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून आमच्या मार्गात अडथळे आणले जात असले तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहे, हे सरकारने विसरु नये…!

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ