AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूर: विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना चिकन मसाल्याच्या पाकिटांचे वाटप, वारकरी संतापले

Pandharpur: दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी भेट देत असतात. मात्र पंढरपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आला आहे.

पंढरपूर: विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना चिकन मसाल्याच्या पाकिटांचे वाटप, वारकरी संतापले
Pandharpur
| Updated on: Oct 18, 2025 | 5:31 PM
Share

देशभरात दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी भेट देत असतात. मात्र पंढरपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारकरी संप्रदायात शाकाहार हा सर्वश्रेष्ठ हार मानला जातो. मांसाहार, मद्यपान अशा गोष्टींना वारकरी सांप्रदाय विठ्ठल भक्तांमध्ये थारा नाही. मात्र पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाल्याचे वाटप

विठ्ठल मंदिरामध्ये बीव्हीजी कंपनीकडून आउट सोर्सिंग पद्धतीने सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी पुरवले जातात. याच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला देण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देखील या कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून कंपनीला नोटीस बजावली आहे.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली आहे.

कंपनीला नोटीस

या प्रकाराबाबत बोलताना विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी म्हटले की, ‘आता दिवाळी सणाला सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणात भाविक फक्त पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत आहेत. आपण सुरक्षारक्षक खाजगी कंपनीकडून घेतलेले आहेत, बीव्हीजी कंपनीकडून सुरक्षारक्षकांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. त्या गिफ्टमध्ये विविध प्रॉडक्ट आहेत, तसेच मसाले आहेत आणि त्याच्यामध्येच चिकन मसाला सुद्धा आहे.’

पुढे बोलताना राजेंद्र शेळके म्हणाले की, ‘सदरची घटना लक्षात आल्यानंतर ताबडतोब कंपनीने वाटप थांबवलेलं आहे. कारण मसाले असले तरी त्याच्यावरती जे छायाचित्र आहे ते आक्षेपार्ह आहे. पांडुरंगाच्या या पवित्र भूमीत या मंदिराचा आणि येथील सर्वांनीच या मंदिराचे पावित्र्य जपणं गरजेचं आहे. सदरची बाब मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहेत सदर कंपनीला कालच मंदिर समितीमार्फत नोटीस दिलेली आहे आणि निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाईल.’

माऊली महाराज शिरवळकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं की, कर्मचाऱ्यांना चिकन मसाला पाकिट भेट देणे म्हणजे पोलीस चौकीवर दरोडा टाकल्यासारखे आहे. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे की, दिवाळीला लाडू चिवडा गिफ्ट द्यायला हवा. आता ते चिकन मसाला वाटत आहेत. आगामी काळात ते चिकन वाटू शकतात. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.