मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता; भाजपच्या पोस्टरवरही पंकजा यांना मानाचं स्थान

Pankaja Munde and Dhananjay Munde on Same Stage : मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. शासन आपल्या गावी या कार्यक्रमाचं आज परळीत आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या तर मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यात आहे.

मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता; भाजपच्या पोस्टरवरही पंकजा यांना मानाचं स्थान
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 2:08 PM

परळी, बीड | 05 डिसेंबर 2023 : मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. बीडच्या परळीत आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होणार आहे. यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री धनंजय मुंडे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. परळीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि स्थानिक आमदार परळीत येणार आहेत. अशात मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे कार्यक्रमाला उपस्थित राहणार?

पंकजा मुंडे देखील शासन आपल्यादारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. तर देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर पाहायला मिळतील. त्यामुळे या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असेल. तर भाजपच्या पोस्टर्सवरही पंकजा मुंडे यांचे फोटो दिसत आहे.

मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येणार?

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ही जरी भावंडं असली तरी हे दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. 2019 ला धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून परळी विधानसभा निवडणूक लढवली. तर भाजपकडून पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. या अटीतटीच्या लढाईत धनंजय मुंडे हे विजयी झाले. तर पंकजा मुंडे पराभूत झाल्या. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय लढाई ही अटीतटीची आहे. अशात आज जर पंकजा मुंडे या कार्यक्रमाला हजर राहिल्या तर मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही छुपा संघर्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. आज जर पंकजा मुंडे या कार्यक्रमात हजर राहिल्या तर भाजपचे हे दोन बडे नेतेदेखील एका मंचावर दिसण्याची शक्यता आहे.

परळीत पोलीस बंदोबस्त

परळीत आज शासन आपल्यादारी कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात शिंदे सरकारमधील मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत. या मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. परळीत 1500 पोलिसांचा बंदोबस्तात तैनात आहे. गोपीनाथ गड, थर्मल कॉलनी हेलिपॅडवर मोठा बंदोबस्त तैनात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव आक्रमक असल्याने बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.
'ते नेहमीसारखं उशीर...', शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची टोलेबाजी
'ते नेहमीसारखं उशीर...', शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची टोलेबाजी.
'किमान तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका', फडणवीसांनी पवारांना दिला दाखला
'किमान तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका', फडणवीसांनी पवारांना दिला दाखला.
सोमय्यांचा अभ्यास खोटा? अजितदादा DCM अन् दुसऱ्या दिवशी संपत्तीची वापसी
सोमय्यांचा अभ्यास खोटा? अजितदादा DCM अन् दुसऱ्या दिवशी संपत्तीची वापसी.
सोलापुरातील मारकडवाडी राजकीय केंद्र,शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधणार
सोलापुरातील मारकडवाडी राजकीय केंद्र,शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधणार.
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिवसेनेची संमती की विरोध?
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिवसेनेची संमती की विरोध?.
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO.