
राज्यातील महानगर पालिकांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांशी महापालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे. मात्र भाजपला परभणीत मोठा धक्का बसला आहे. परभणीतील 65 पैकी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 25 जागा मिलाल्या आहेत. तर काँग्रेस आणि भाजपा संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 12 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीला 11 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला परभणीत भोपळाही फोडता आलेला नाही. तर इतरांनी 5 जागांवर विजय मिळवला आहे.
परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेने आघाडी करत निवडणूक लढवली होती. आता मतदारांनी या आघाडीच्या पारड्यात सत्तेची माळ टाकली आहे. आता परभणीत काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेना ठाकरे गटाचा महापौर बसणार आहे. हा भाजपसाठी आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.
Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...
BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...
बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची ताकद कमी पडली आहे. त्यामुळे भाजपच्या ताब्यातून महापालिका निसटली आहे. या निकालानंतर भाजपने नम्रपणे पराभव स्वीकारला आहे. परभणीत आमच अपयश, आम्ही पराभावाचे चिंतन करू. अशी प्रतिक्रिया बोर्डीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला आहे. मुंबईत भाजपला 88 आणि शिवसेनेला 28 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुंना 73 आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. तर इतर आणि अपक्षांचा आकडा 10 इतका आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत महायुतीचा हिंदू मराठी महापौर बसणार आहे. या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. मात्र या युतीचा फारसा प्रभाव निकालावर झालेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 67 आणि मनसेला केवळ 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.