AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझ्या टिप्पर सोडा…”, सुरेश धसांनी आरोप केलेल्या पोलीस अधिकाऱ्याची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

भास्कर केंद्रे हा पोलीस गेल्या 15 वर्षांपासून परळीत आहे. त्याच्याकडे 15 जेसीबी, 100 राखेचे टीपर आणि तेथील मटका व्यावसायिकाबरोबर त्याची भागीदारी आहे", असा आरोप सुरेश धस यांनी केला होता.

माझ्या टिप्पर सोडा..., सुरेश धसांनी आरोप केलेल्या पोलीस अधिकाऱ्याची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल
suresh dhas bhaskar kendre
| Updated on: Jan 30, 2025 | 8:21 PM
Share

“बीड जिल्ह्यात आणि परळीत अनेक वर्षांपासून काही पोलीस अधिकारी नोकरीला आहेत. त्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे? भास्कर केंद्रे हा पोलीस गेल्या 15 वर्षांपासून परळीत आहे. त्याच्याकडे 15 जेसीबी, 100 राखेचे टीपर आणि तेथील मटका व्यावसायिकाबरोबर त्याची भागीदारी आहे”, असा आरोप सुरेश धस यांनी केला होता. आता हा आरोप खोटा असल्याचे परळीतील पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांनी सांगितले आहे. माझ्याकडे टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, असे भास्कर केंद्र म्हणाले.

भास्कर केंद्रे यांची एक कथित ऑडिओ क्लिप ‘टीव्ही 9 मराठी’च्या हात लागली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बोलत आहेत. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी भास्कर केंद्रे यांना तुमच्याकडे कसले टिप्पर आहेत, असा प्रश्न विचारला. त्यावर भास्कर केंद्रेंनी माझ्याकडे टिप्पर सोडा, साधा टायरही नाही. जर माझ्या कोणत्याही नातेवाईकाकडे, मित्राकडे किंवा इतर कोणाकडे टायर जरी असेल तर मी एका मिनिटात राजीनामा देईन. माझ्यावर कशामुळे हे आरोप होतात हे समजत नाही. तुम्ही कोणालाही माझ्या गावात पाठवा माझ्याबद्दल विचारा. आता मुलीचं लग्न झालं तेव्हा मी कर्ज घेतलं होतं, असे भास्कर केंद्रे यांनी म्हटले आहे.

“जेसीबी आणि हायवा हे घेण्याइतपत माझी ऐपत नाही”

यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ने भास्कर केंद्रे यांच्याशी संपर्क साधला. यावेळीही त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. “मी जे काही बोललोय ते खरं बोललो आहे. सुरेश धस यांनी स्वत:च सांगितलं आहे की इथे येऊन चौकशी करा. आता मी ही सांगतो की इथे येऊन चौकशी करा. जेसीबी आणि हायवा हे घेण्याइतपत माझी ऐपत नाही. माझ्याकडे काहीही असतं तर मी गुपचूप बसलो असतो किंवा फोन बंद केला असता”, असे भास्कर केंद्रे म्हणाले.

“पोलीस महासंचालकांनी माझा सन्मान केला”

“सुरेश धस हे राष्ट्रवादीत असताना आम्ही काही कारवाई केलेल्या होत्या. त्यामुळे पूर्ववैमन्यसातून ते हे बोलत असावेत. मी आता बाहेर आहे. यानंतर मी याबद्दल कायदेशीर पावलं उचलणार आहे. माझ्या कुटुंबाचे, माझ्या मुलीचे फोटोही व्हायरल करण्यात आले. पोलीस खात्यात काम करत असताना माझा रेकॉर्ड तुम्ही पाहा. पोलीस महासंचालकांनी माझा सन्मान केला आहे”, असेही भास्कर केंद्रेंनी म्हटले.

सुरेश धस यांचे भास्कर केंद्रेंवर गंभीर आरोप

दरम्यान सुरेश धस यांनी बोलताना भास्कर केंद्रे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “15 वर्षांपासून भास्कर केंद्रे हे तिथेच आहेत. त्यांचे स्वत:चे १५ जेसीबी आहेत. १०० राखेचे टिप्पर आहेत. तिथल्या मटक्यावाल्यासोबत त्यांची आर्धी पार्टनरशीप आहे. मीडियाने परळीत जाऊन चेक करावं”, असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. सुरेश धस यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. आता भास्कर केंद्रेंनी हे आरोप फेटाळले आहेत.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.