हिवाळी अधिवेशनाबाबत संसदीय समितीची बैठक, अंतिम निर्णयावर चर्चा

या बैठकीत हिवाळी अधिवेशन घ्यायचं की रद्द करायचं, याबाबतचा निर्णय होणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:25 PM, 2 Dec 2020

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हिवाळी अधिवेशन होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घ्यायचं की नाही यावर संसदीय समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत हिवाळी अधिवेशन घ्यायचं की रद्द करायचं, याबाबतचा निर्णय होणार आहे. (Parliament Committee Meeting on Winter session)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र हे अधिवेशन घ्यायचं की नाही याबाबत संसदीय समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेतला जाईल.

तसेच जर हिवाळी अधिवेशन पार पडलं तर ते 7 ते 9 डिसेंबरपर्यंत आयोजित केलं जाऊ शकतं. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत. तर काही कार्यक्रम हे ऑनलाईन पार पडत आहे. हे अधिवेशन नागपुरात पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या नागपुरात अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार निवासात रंगरंगोटी सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी अधिवेशनासाठी आमदार निवासात रंगकाम करण्यात आले होते. त्यासाठी जवळपास पावणे दोन कोटींचा खर्च करण्यात आला होता. यंदाही यासाठी आठ कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. संच अधिवेशनादरम्यान कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय करण्यात आली आहे. (Parliament Committee Meeting on Winter session)

संबंधित बातम्या : 

नागपूर अधिवेशनासाठी आमदार निवासात डागडुजी, कोरोना संकटात सरकारची आर्थिक उधळपट्टी?

नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय, निगेटिव्ह प्रेशर रुम म्हणजे काय?