AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना डाळींचा हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, पाशा पटेल यांचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना साकडं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांना परिस्थितीची माहिती देण्यासंदर्भात सुचवले होते. त्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात पाशा पटेल यांनी गोयल यांची भेट घेतली.

शेतकऱ्यांना डाळींचा हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, पाशा पटेल यांचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना साकडं
पियूष गोयल, पाशा पटेल
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 6:55 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारच्या डाळींच्या साठवणुकीवर बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा या साठी प्रयत्न करा अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी डाळीच्या साठवणुकीवर बंदी घातली. त्यानंतर देशभरात व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांना परिस्थितीची माहिती देण्यासंदर्भात सुचवले होते. त्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात पाशा पटेल यांनी गोयल यांची भेट घेतली. (Pasha Patel meet Piyush Goyal to demand guarantee for pulses)

केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि पाशा पटेल यांच्या बैठकीला व्यापारी प्रतिनिधींचीही उपस्थिती होती. सरकारच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद केल्या आहेत. साठवणुकीच्या मर्यादा आल्याने डाळींच्या दरामध्ये 500 ते 1 हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये डाळी विकाव्या लागत आहेत. या विषयात वाणिज्य मंत्र्यांनी लक्ष घालावे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावे. डाळींचा हंगाम संपलेला आहे. सरकारने हमीभावाची खरेदी केंद्र बंद केली आहेत. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता तेजी-मंदीचा फायदा घेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी माल घरात ठेवलेला आहे. त्यांना आता कमी दरात विक्री करावी लागत आहे, अशी माहिती पाशा पटेल यांनी या बैठकीत गोयल यांना दिली. शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन गोयल यांनी दिल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं.

डाळवर्गीय शेतीमालासाठी साठवण मर्यादा निश्चित

केंद्र शासनाने डाळवर्गीय शेतीमालासाठी साठवण मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना पाच टन, तर घाऊक व्यापाऱ्यांना 200 टन इतकाच डाळींचा साठा करता येणार आहे. या निर्णयाविरोधात राज्यात येत्या 16 जुलैला बाजार समित्या एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेले मुंबई एपीएमसी मार्केटमधील मसाला आणि धान्य मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महिना ग्रोमाचे सचिव भीमजी भानुशाली यांनी दिली आहे.

डाळीच्या बाजार समित्या 16 जुलैला बंद

गेली 120 वर्षांपासून व्यापाऱ्यांसाठी ग्रोमा संस्था काम करते. त्याशिवाय सरकारच्या प्रत्येक निर्णयात आमचे सहकार्य असते. पण ग्रोमाला विश्वासात न घेता रातोरात हा कायदा करण्यात आला असल्याने आम्ही त्याचा विरोध करतो. त्यामुळे भारतातील संपूर्ण डाळीच्या बाजार समित्या 16 जुलैला बंद राहणार आहे.

संबंधित बातम्या :

महाविकास आघाडीतील कुरबुरी पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक; न्यायासाठी हेलपाटे सुरूच

Pasha Patel meet Piyush Goyal to demand guarantee for pulses

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.