AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर, अनेकांचे बिंग फुटणार; देवेंद्र फडणवीसांचा दावा

पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. (phone tapping report has submitted to home ministry, says devendra fadnavis)

फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर, अनेकांचे बिंग फुटणार; देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis
| Updated on: Mar 27, 2021 | 5:27 PM
Share

नागपूर: पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे बिंग फुटणार असल्यानेच राज्यातील नेते अस्वस्थ आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (phone tapping report has submitted to home ministry, says devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झाला आहे. त्यातून अनेकांचे बिंग फुटणार आहे. त्यामुळेच अनेकजण अस्वस्थ झाले आहेत, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी करण्याचं काम कुणी केलं? वाझे सारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. वाझे सारख्यांना सेवेत घेऊन सिंडिकेट राज चालवण्यात आलं. त्यामुळे पोलीस बदनाम झाले की पोलिसांचं नाव झालं ते सांगा? असा सवाल त्यांनी केला.

वाझेंचे बोलविते धनी चिंतेत

एनआयएच्या चौकशीमुळे आघाडीतील लोक अस्वस्थ आहेत. नवाब मलिक आणि त्यांचे सहकारी घाबरले आहेत. वाझे काय बोलणार याची त्यांना भीती वाटत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे वाझेंचे बोलविते धनी चिंतेत आहेत, असंही ते म्हणाले. मी केवळ फोन टॅपिंग प्रकरणाचे दोन पाने दिली होती. मलिक यांनी अख्खा अहवाल देऊन अहवाल फोडला, असा दावाही त्यांनी केला.

सावंतांना काय उत्तर द्यायचं?

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावेळी फडणवीसांनी सावंतांची अक्षरश: खिल्ली उडवली. सचिन सावंतांना मी काय उत्तर द्यायचं. त्यांना कीह समजतं तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. असं रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार? असा टोलाही त्यांनी लगावला.

डीव्हीआरचा बॅकअप मेन सर्व्हरला

पोलिसांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर कुणीही गायब केली तरी त्याचा बॅकअप मेन सर्व्हरला आहे. प्रायव्हेट डीव्हीआर नष्ट करणं सोपं आहे. पण पोलिसांचा डीव्हीआर गायब करणं सोपं नाही. त्यामुळे त्याचे पुरावे मिटणार नाहीत. तशी व्यवस्थाच करून ठेवली आहे, असंही ते म्हणाले.

कोरोनाच्या स्थितीचा विचार करा

देशातील कोरोनाची स्थिती आणि महाराष्ट्राची स्थिती यातील अंतर इतके का आहे, याचा विचार महाराष्ट्र सरकारला करावा लागेल. जितक्या लस केंद्राने दिल्या, त्या अजूनही वापरलेल्या नाहीत. त्यामुळे उगाच केंद्रावर टीका करण्याऐवजी प्रत्यक्ष कोरोना नियंत्रणाचे उपाय राबविले पाहिजे. नागपुरातील स्थिती दिवसांगणिक भयावह होते आहे. 4500 केसेस दररोज आढळत आहेत. स्थिती गंभीर आहे. प्रशासनाने पूर्णपणे अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये जाऊन लोकांना दिलासा द्यावा आणि प्रत्यक्ष मदतही करावी, असे ते म्हणाले. (phone tapping report has submitted to home ministry, says devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

सचिन वाझे कुणाच्या जवळचे? परमबीर सिंगांची चौकशी का होत नाही?; काँग्रेसचा एनआयएला सवाल

Photo: बाबांनो मास्क वापरा, नाही तर लॉकडाऊन अटळ; भुजबळांनी भर बाजारात हात जोडले!

परमवीर सिंहांना वाचवण्यासाठी भाजपची कव्हरिंग फायर; एनआयए गायब DVR ची चौकशी का करत नाही?

(phone tapping report has submitted to home ministry, says devendra fadnavis)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.