नंदवाळमधील रिंगण सोहळ्याचा वाद चिरघळला; पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील रिंगण सोहळ्याचा वाद चिरघळला आहे. वाद वाढल्यामुळे वारकरी देखील आक्रमक झाले. यावेळी वारकरी आणि पोलीसांमध्ये बाचाबाची झाली.

नंदवाळमधील रिंगण सोहळ्याचा वाद चिरघळला; पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की
पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 4:04 PM

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ (nandaval) येथील रिंगण सोहळ्याचा वाद चिरघळला आहे. वाद वाढल्यामुळे वारकरी देखील आक्रमक झाले. यावेळी वारकरी आणि पोलीसांमध्ये (police) बाचाबाची झाली. प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. भारत बटालियनच्या आरक्षीत जागेत रिंगण सोहळा करण्याचा अग्रह वारकऱ्यांनी धरला होता. मात्र भारत बटालियनने या सोहळ्याला विरोध केला. भारत बटालियनने विरोध केल्याने वारकरी देखील आक्रमक झाले. ते त्याच जागेवर रिंगण सोहळा करण्यासाठी आडून बसले होते. याचदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी आलेले पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर वाद मिटला, मात्र गावात तणावपूर्ण शांतता पहायला मिळाली.

वाद का झाला?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अखंड हरिणाम सप्ताह निमित्त प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे वारकाऱ्यांच्या वतीने रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र जिथे या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ती जागा आरक्षित असल्यामुळे भारत बटालियनकडून त्या जागेत रिंगण सोहळा करण्यास विरोध करण्यात आला. मात्र वारकरी देखील त्याच जागेत रिंगण सोहळा करण्यावर ठाम असल्याने वाद चिरघळला.

पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

दरम्यान वाद चिरघळल्यामुळे पोलीस मध्यस्थी करण्यासाठी आले. मात्र यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. वारकरी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंत पोलिसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवले मात्र गावात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

Heat Wave : महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात उष्णतेची लाट, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाडा तापणार

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, संदीप क्षीरसागरांवर गंभीर आरोप

Jalna Photo | चुलीवर पोळ्या भाजून महागाईचा निषेध, जालन्यात शिवसेनेचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.