Jalna Photo | चुलीवर पोळ्या भाजून महागाईचा निषेध, जालन्यात शिवसेनेचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

जालना | शिवसेनेच्या वतीने जालन्यात केंद्रसरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेल, रासायनिक खतांचा भवावाढी हे आंदोलन करण्यात आले आहे.

Mar 28, 2022 | 3:32 PM
संजय सरोदे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Mar 28, 2022 | 3:32 PM

जालन्यात शिवसेनेच्या वतीने वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. शिवसैनिक महिलांनी यावेळी चुलीवर पोळ्या भाजून केंद्र सरकारचा निषेध केला.

1 / 5
केंद्र सरकारविरोधातील या आंदोलनात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक शिवसैनिक हजर होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

2 / 5
केंद्र सरकारने इंधनातील दरवाढीविरोधात काहीतरी ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जालन्यातील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.

3 / 5
 जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ कमी न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या वेळी अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. औरंगाबादमध्येदेखील काल शिवसेनेने क्रांती चौकात महागाईविरोधात आंदोलन केले.

4 / 5
जालन्यात शिवसेनेने केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली. आकाशाला भिडलेल्या गॅस आणि इंधनाच्या दरांवर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें