बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, संदीप क्षीरसागरांवर गंभीर आरोप

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, संदीप क्षीरसागरांवर गंभीर आरोप
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्त्ये पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अमर नाईकवाडे, फारूक पटेल, बाबूशेठ लोढा, गंगाधर घुमरे, नितीन लोढा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आज ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: अजय देशपांडे

Mar 28, 2022 | 3:31 PM

बीडचं राजकारण हे क्षीरसागर घराण्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये क्षीरसागर घराण्यामध्ये फूट पडली आणि माजी आमदार जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांचे पुतने संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवत जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते. मात्र आता जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पांडण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे (ncp) अनेक कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अमर नाईकवाडे, फारूक पटेल, बाबूशेठ लोढा, गंगाधर घुमरे, नितीन लोढा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आज ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताना आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नेमके आरोप काय?

यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, आमदार संदीप क्षीरसागर यांची सध्याची कार्यपद्धत वेगळी आहे.
आमदार संदीप क्षीरसागर हे विकास कामे करण्याऐवजी काम अडवतात. पालकमंत्र्यांनी तालुक्यात आणलेल्या विकास कामांचे श्रेय घेतात. पक्ष स्थापनेपासून आम्ही राष्ट्रवादीत होतो, परंतु आमदारांच्या जाचामुळे आता आम्हाला शिवसेनेत जावे लागत आहे. पोटाला दगड बांधून आम्ही संदीप यांना निवडून आणले होते. मात्र सध्याचे आमदार हे निष्क्रिय निघाले त्यामुळे आता आम्ही शिवसेनेते प्रवेश करत आहोत.

चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अमर नाईकवाडे, फारूक पटेल, बाबूशेठ लोढा, गंगाधर घुमरे, नितीन लोढा  यांचा यामध्ये समावेश आहे. आम्ही जयदत्त क्षीरसागर यांच्या नेत्वृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी संदीर क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

Pramod Sawant : प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, मंत्रिमंडळात गोमंतक पक्षाला स्थान नाही, कोण आहेत नवे मंत्री?

Parliament Members Visit Baramati : जेव्हा देशभरातील खासदार बारामतीला भेट देतात…

राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेच दिसलं, Pankaja Munde यांची टीका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें