AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक कोटीची लाच, फरार पोलीस निरीक्षक अखेर आला शरण, घरात मिळाले होते कोट्यवधी रुपये, सोने अन् चांदी

maharashtra acb: लाचखोर फरार पोलीस निरिक्षक हरिभाऊ खाडे एसीबी समोर शरण आला आहे. खाडेला पकडण्यासाठी पोलिसांचे तीन पथक फिरत होते. आता चौकशीतून खाडेने जमवलेली अपसंपदा समोर येणार आहे.

एक कोटीची लाच, फरार पोलीस निरीक्षक अखेर आला शरण, घरात मिळाले होते कोट्यवधी रुपये, सोने अन्  चांदी
हरिभाऊ खाडे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 23, 2024 | 2:28 PM
Share

बीड पोलीस दलातील एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे अखेर शरण आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला हरिभाऊ खाडे याच्या चाणाक्यपुरी येथील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला (एसीबी) घबाड मिळून आले. एसीबीला एक कोटी आठ लाख ७६ हजार रुपये रोख, ७२ लाखांचे सोन्याची बिस्किटे आणि सोने, चार लाखांची साडे पाच किलो चांदी मिळून आली आहे. 15 मे रोजी एक कोटीच्या लाचेतून पाच लाख घेताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाने अटक केली होती. त्यानंतर हरिभाऊ खाडेचा सोध घेत होते. अखेर खाडे एसीबी पोलिसांना शरण आले आहे.

काय होते प्रकरण

जिजाऊ मल्टिस्टेट पथसंस्थेच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक कोटीची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, फौजदार आर. बी. जाधवर हे फरार झाले. त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथके नेमली होती.

एसीबी समोर शरण

लाचखोर फरार पोलीस निरिक्षक हरिभाऊ खाडे एसीबी समोर शरण आला आहे. खाडेला पकडण्यासाठी पोलिसांचे तीन पथक फिरत होते. आता चौकशीतून खाडेने जमवलेली अपसंपदा समोर येणार आहे.

बीडमध्ये एसीबीची दुसरी कारवाई

माजलगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे एसीबीने कारवाई केली. त्याच्या घरात लाखोंचा ऐवज मिळाला आहे. माजलगाव पाटबंधारे विभाग परळी (वर्ग 1) कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर या अधिकाऱ्याला तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याचा परवानगी मिळण्यासाठी 28 हजाराची लाच घेताना बीड ACB ने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.

अंबाजोगाईत आनंद नगर येथील त्याच्या घराची पंचा समक्ष झडती घेतली. यावेळी 11 लाख 78 हजार 465/- रुपये रोख, सोन्याचे 30 ग्रॅम दागिने, तीन किलो चांदी असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना