रेव्ह पार्टीमधील त्या तीन महिलांबद्दल मोठा खुलासा, एकनाथ खडसेंच्या जावयासोबत काय संबंध?, तपासात मोठी माहिती पुढे
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीतून अटक केली. या पार्टीतून काही महिला पळून गेल्याचे सांगितले गेले. आता त्याबद्दलच मोठा खुलासा झाला आहे. आज प्रांजल यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टी सध्या तूफान चर्चेत आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. या पार्टीत काही पुरूषांसोबतच महिलांचा देखील समावेश होता. पार्टीतून गांजा, कोकेन आणि दारू पोलिसांनी जप्त केली. रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांनी ही छापेमारी केली. मात्र, यानंतर सतत पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केली जात आहेत. पुणे पोलिसांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचेही खडसेंनी म्हटले.
रेव्ह पार्टीमधील त्या तीन मुलींबद्दल मोठा खुलासा
आता नुकताच पुणे रेव्ह पार्टीबद्दल अत्यंत मोठी अपडेट ही पुढे येताना दिसतंय. पोलिसांनी जेव्हा छापेमारी केली, त्यावेळी पार्टीच्या ठिकाणाहून तीन महिला पळून गेल्याचे सांगितले जात होते. पण त्या तीन महिलांचा पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिस तपासात पुढे आलंय. न्यायालयात खेवलकरांची पोलीस कोठडी मागताना पोलिसांनी हेच कारण देत म्हटले होते की, संशयित तीन महिलांचा शोध घ्यायचा आहे.
पोलिसांनी कोर्टात दिले होते मुलींचे कारण
पार्टीमध्ये आणखी तीन महिलांचा समावेश होता. मात्र, पोलीस येताच त्या महिला तिथून निघून गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. पण पोलिस तपासात या महिलांचा या पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांची आज पोलीस कोठडी संपणार आहे. आज खेवलकरांना कोर्टात हजर केले जाईल.
पोलिस तपासात अखेर मोठी माहिती आली पुढे
आज दुपारी पुणे पोलिसांची गुन्हे शाखा प्रांजल खेवलकरांसह इतर चार जणांना न्यायालयात हजर करणार आहे. या प्रकरणात आज प्रांजल खेवलकर यांना दिलासा मिळतो का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. रोहिणी खडसे यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यानंतरच हे प्रकरण घडल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी देखील गिरीष महाजन यांच्यावर टीका केली होती.
