VIDEO: बुलडाण्यात सेना-भाजपात फुल्ल ऑन राडा, सेना आमदाराच्या वक्तव्यावर भररस्त्यात जाळपोळ

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर भाजपनं आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध रान उठवलंय.

  • गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा
  • Published On - 0:29 AM, 19 Apr 2021
VIDEO: बुलडाण्यात सेना-भाजपात फुल्ल ऑन राडा, सेना आमदाराच्या वक्तव्यावर भररस्त्यात जाळपोळ

बुलडाणा : संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर माजला आहे. बुलडाणा जिल्ह्यातही तिच परिस्थिती आहे. रुग्णांना रेमडेसिवीर, ऑक्सीजन, बेड मिळेनासे झालेत. ते मिळवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून कुठलीच मदत मिळत नसल्याचा आरोप करत बुलडाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. मात्र, ही टीका करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर भाजपनं आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध रान उठवलंय (Political fighting of Shivsena and BJP in Buldhana over controversial statement).

बुलडाण्यात राडा, शिवसैनिकांची भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

जळगाव जामोद येथील भाजप आमदाराने 144 कलमाचे उल्लंघन करत 50 ते 60 जणांना घेऊन चौकात संजय गायकवाड यांचा पुतळा जाळला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. बुलडाणा येथे सुद्धा भाजप नेते विजयराज शिंदे यांनी आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनी मज्जाव केला आणि माजी आमदार विजयराज शिंदेंसह 4 ते 5 कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी जमा झाले. अद्यापपर्यंत गुन्हे दाखल झाले नव्हते.

शिवसैनिकांनी भाजप आमदाराचा पुतळा जाळला

दरम्यान, बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार संजय कुटे यांचा पुतळा जाळला. यावेळी शिवसैनिकांनी भाजपच्या संजय कुटे विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मोताळा येथे सुद्धा शिवसैनिकांनी भाजप आमदार संजय कुटे यांचा पुतळा जाळला.

हेही वाचा :

Video: आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी, सेना आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर; नितेश राणेंचा शिवसेना आमदारावर पलटवार

व्हिडीओ पाहा :

Political fighting of Shivsena and BJP in Buldhana over controversial statement