AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UBT MPs Spilt : मोठी बातमी, फक्त तासभर थांबा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठं स्टेटमेंट

UBT MPs Spilt : फक्त तासभर थांबा, सर्व चित्र स्पष्ट होईल असं मोठ वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलं आहे.

UBT MPs Spilt : मोठी बातमी, फक्त तासभर थांबा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठं स्टेटमेंट
Sanjay Shirsat
| Updated on: Jun 18, 2026 | 11:33 AM
Share

महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याची चर्चा आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महत्वाची माहिती दिली. तासाभरात सर्व चित्र स्पष्ट होईल असं ते म्हणालेत. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. दिल्लीत उद्धव ठाकरे गटाने व्हीप जारी करुन बैठक बोलावली आहे. या बैठकीला किती खासदार पोहोचतात हे सुद्धा महत्वाचं आहे. “ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला किती जण जातात, त्या संदर्भात काय माहिती समोर येते, याकडे आम्ही तटस्थतेने पाहतोय” असं संजय शिरसाट म्हणाले.

त्या सहा खासदारांपैकी दोन खासदारांनी स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत, या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले की, “तिथे काय घडलय याची आम्हाला कल्पना नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोणी किती सह्यांच निवेदन दिलय, त्या बद्दल माहिती नाही” “तासभरात सर्व कळेल, ओम बिर्ला यांनी त्या गटाला मान्यता दिली, नाही दिली ते सर्व समजेल” असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं.

कायदा त्यांना कळतो आणि यांना नाही असं नाहीय

ठाकरे गटाने बैठकीसाठी 11 ची वेळ दिली असेल, तर चित्र 12 पर्यंत स्पष्ट झालं पाहिजे. खासदारांची खासदारकी रद्द होऊ शकते, यावर संजय शिरसाट म्हणाले की, “संबंधित खासदारांनाही याची कल्पना असेल. जे-जे होईल त्याला सामोरं जाण्याची त्यांची तयारी असेल. खासदारांना जो काय निर्णय घ्यायचाय तो ते घेतली. कायदा त्यांना कळतो आणि यांना नाही असं नाहीय”

ते उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय उबाठाकडे कोणताही पर्याय नाही

“आता जे-जे होईल ते उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय उबाठाकडे कोणताही पर्याय नाही. त्यांचे स्टेटमेंट पाहिले तर आजही त्यांना त्यांचं गांभीर्य वाटत नाही. आमच्यावर दोषारोप करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष पाहा. एकनाथ शिंदेंचा नंदनवन हा शासकीय बंगला किंवा ठाण्याच्या घरी जा, रोज हजारोंचा तांडा पक्ष प्रवेशासाठी येत असतो” असं संजय शिरसाट म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी