AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांचे आदेश, खड्डे बुजवा, पण अधिकाऱ्यांकडून केराची टोपली, आता खड्ड्यांमुळे वाहनांच्या तीन किमीपर्यंत रांगा

मुंबई नाशिक महामार्गावर घोटी, सिन्नर फाटा परिसरातील रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा शुक्रवारी लागल्या आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी दिलेल्या आदेशानंतर खड्डे कायम आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आदेश, खड्डे बुजवा, पण अधिकाऱ्यांकडून केराची टोपली, आता खड्ड्यांमुळे वाहनांच्या तीन किमीपर्यंत रांगा
मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 30, 2024 | 11:57 AM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंधरा दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी मुंबई- नाशिक महामार्गावर प्रवास करत शहापूरपर्यंत महामार्गाचा आढावा घेतला होता. त्यानंतर महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतरही महामार्गावर खड्डे बुजले गेले नाही. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची समस्या जैसे थे आहे. अद्यापही महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांच साम्राज्य आहे. महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या आदेशानंतरही वाडीवऱ्हे, विल्होळी, घोटी परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

काय झाले मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे

महामार्गावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. यामुळे मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई या प्रवासाला अधिक वेळ लागत आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाला खड्डे बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. त्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

तीन किमीपर्यंत लागल्या रांगा

मुंबई नाशिक महामार्गावर घोटी, सिन्नर फाटा परिसरातील रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा शुक्रवारी लागल्या आहेत. यामुळे मुंबई-नाशिक प्रवास रस्ते मार्गांऐवजी रेल्वेमार्गाने अनेक जण करु लागले आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही नाशिकमध्ये बैठक घेतली होती. त्यात त्यांनीसुद्धा रस्त्यातील खड्डे बुजवून तात्काळ रस्ते चांगले करण्याचे आदेश दिले होते. तसेच यासंदर्भात दिरंगाई झाली तर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. गणेशोत्सवाच्या आत खड्डे बुजवण्याचे आदेश त्यांनी काढले होते. परंतु अजूनही काम सुरु नाही.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन