AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल गैरहजर का? हसन मुश्रीफ यांनी सांगूनच टाकलं

मंगळवारी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे हजर होते. मात्र, प्रफुल पटेल हे मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर राहिले त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु होत्या. आता हसन मुश्रीफ यांनी प्रफुल पटेल गैरहजर का होते याबाबत सांगितले आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल गैरहजर का? हसन मुश्रीफ यांनी सांगूनच टाकलं
Hasan MushrifImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 27, 2026 | 11:11 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगळवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) ‘साईडलाईन’ झालेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोघेच चर्चेचा विषय ठरले. पण, प्रफुल पटेल हे मुंबईत असूनही त्यांनी बैठकीला अनुपस्थिती दाखवली. आता प्रफुल पटेल बैठकीला का आले नाहीत? याची चर्चा सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी प्रफुल पटेल यांनी बैठकीला दांडी का मारली याबाबत सांगितले आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपतविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. परंतू संपूर्ण पक्ष एकसंग असल्यामुळे आणि त्यावेळी देखील वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे त्या वेळी या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आले त्याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली हे खरं आहे. पुढे ते म्हणाले की, मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुलभाई आपल्या कामानिमित्त गेले होते त्यामुळे गैरहजर होते.

तटकरेंनी व्यक्त केली खंत

सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणे, पक्ष एकसंध ठेवणे यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यानंतर उदभवलेल्या स्थितीमधे आमच्या दोघांवर टीका सुरु असताना पक्षाचा एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही. याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुनही मी आणि पटेल दोघेच टीकेच्या तोफेच्या तोंडी गेलो. त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही पुढे येऊन आमची बाजू मांडण्याचा किंवा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही?

तटकरेंचा सवाल ऐकल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. मात्र, तटकरे यांनी भुजबळांच्या प्रयत्नाला न जुमानता आपले बोलणे सुरुच ठेवले. या सगळ्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीत तणाव निर्माण झाला आहे. तसेच सुनील तटकरे बोलण्यासाठी उभे राहताच पार्थ पवार हे तेथून तडकाफडकी निघून गेले.

Follow Us
देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक
देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक.
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं...
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं....
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली.
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा.
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...