विजय वडेट्टीवार बिनडोक, लायकी काय?; प्रकाश आंबेडकर का संतापले?

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा धडाका सुरू आहे. ह्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 25 ऑक्टोबर रोजी अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

विजय वडेट्टीवार बिनडोक, लायकी काय?; प्रकाश आंबेडकर का संतापले?
Prakash AmbedkarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 6:50 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं धक्कादायक विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. वडेट्टीवार यांच्या या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. वडेट्टीवार बिनडोक आहेत. त्यांची लायकी काय आहे? ज्यांची कुवत नाही अशा लोकांना काँग्रेसने विरोधी पक्षनेता बनवलं आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? हे मूर्ख आहेत सगळे. यांना काय बाबासाहेब कळणार?, असा संतप्त सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी संविधान रॅली आयोजित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. येत्या 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कात ‘संविधान के सन्मान में’ या रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या रॅलीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आम्हाला शिवाजी पार्क पोलिस ठाण्यातून रॅलीसाठी नुकतीच परवानगी मिळाली आहे. रॅलीसाठीचा वेळ कमी आहे. तरीही आम्ही राहुल गांधी यांना आमंत्रित करत आहोत. ते येतील अशी आशा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आंबेडकर आणि राहुल गांधी एकाच मंचावर येण्याची शक्यता बळावली आहे.

ठाकरे गटालाही निमंत्रण

या रॅलीसाठी ठाकरे गटालाही निमंत्रित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती आहे. त्यामुळे ठाकरे गटालाही रॅलीचं निमंत्रण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. संविधान वाचवणे हे राजकारणाच्या पलिकडे आहे, असे आमचे मत आहे, असंही ते म्हणाले.

तर स्वातंत्र्य धोक्यात येईल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर रोजी मसुदा समितीच्या वतीने संविधान सादर केले. जाती आणि धर्माचे राजकारण केंद्रस्थानी घेतल्यास राष्ट्राचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. भाजप आणि आरएसएसने पुन्हा धर्म आणि जातीवरून राजकारण सुरू केले आहे, असे आमचे ठाम मत आहे. हे केवळ आपल्या लोकशाहीला बाधा आणणार नाही तर आपले स्वातंत्र्य देखील कमी करेल. राज्यघटना सौहार्द, स्वातंत्र्य आणि समानतेची मागणी करते. जी वैदिक परंपरेत पाळली जात नाही, असं ते म्हणाले.

मोदींच्या मैदानात…

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात काल भारतीय संघाचा पराभव झाला. त्याबाबत विचारलं असता मोदींच्या मैदानात भारत हरला हा गंभीर विषय आहे. यावर मी विचार करून बोलेन. पण याबाबत आता लोकांनी बोलायला सुरुवात केलीये, हे फार चांगलं लक्षण नाही, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
धमक असेल तर.. मुख्यमंत्री शिंदेंना दिलेला अजितदादांचा तो सल्ला व्हायरल
धमक असेल तर.. मुख्यमंत्री शिंदेंना दिलेला अजितदादांचा तो सल्ला व्हायरल.
अजितदादांच्या दाव्यातील पवारांनी हवाच काढली, विश्वासार्हतेवरही सवाल
अजितदादांच्या दाव्यातील पवारांनी हवाच काढली, विश्वासार्हतेवरही सवाल.
जरांगे पाटलांनी स्वतःच्याच अटकेची व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
जरांगे पाटलांनी स्वतःच्याच अटकेची व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?.
राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसपेक्षा किती जागांवर आघाडी?
राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसपेक्षा किती जागांवर आघाडी?.
छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर
छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर.
तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं BRS चं स्वप्न भंगणार? कॉंग्रेसला अच्छे दिन?
तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं BRS चं स्वप्न भंगणार? कॉंग्रेसला अच्छे दिन?.
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.