राम मंदिराबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, कोर्टाने निकाल तथ्यांवर नव्हे तर भावनांवर दिल्याचा दावा

अयोध्या राम मंदिराचा निकाल हा तथ्य किंवा पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. (Prakash Ambedkar on Ram mandir verdict )

राम मंदिराबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, कोर्टाने निकाल तथ्यांवर नव्हे तर भावनांवर दिल्याचा दावा

मुंबई : “अयोध्या राम मंदिराचा निकाल हा तथ्य किंवा पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते”, असं वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र निकाल हा तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आला, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. (Prakash Ambedkar on Ram mandir verdict)

जगात भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते. मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. मात्र हे सत्य आहे की वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत. हे आता आयोध्येत होत आहे. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाहीत. अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र त्याबाबतचा निकाल हा तथ्यांवर नव्हे तर भावनांवर देण्यात आला, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वाचा : भाजपला लगीनघाई, पण बायको मिळेना, 1 तारखेपासून लॉकडाऊन मोडा : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “राहुल संस्कृती हे इतिहासकार आहे. त्यांनी सांगितले की, अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद ( प्रयागराज ) उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला. परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला आणि पुराव्यांना ग्राहय धरले नाही, यातून एक मार्ग काढला जात आहे असे सांगत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला.

अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगितले असते तर भारतीयांकडे ज्या संशयित नजरेने पाहिले जाते ते दूर झाले असते. कारण भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहेत, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता. मात्र आताचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल”, असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

(Prakash Ambedkar on Ram mandir verdict)

संबंधित बातम्या 

मला गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी : प्रकाश आंबेडकर 

देशाचे मालक आपण आहोत, राजकारणी नाही, सर्वांनी पानटपऱ्या उघडाव्यात : प्रकाश आंबेडकर 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *