मला गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनच्या मुदतवाढीला जोरदार विरोध केला आहे (Prakash Ambedkar on Lockdown extension).

मला गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी : प्रकाश आंबेडकर

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनच्या मुदतवाढीला जोरदार विरोध केला आहे (Prakash Ambedkar on Lockdown extension). सरकारने 31 जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचंही सांगितलं. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आता आम्हाला फक्त लॉकडाऊन मोडावा लागेल. दानदात्यांची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने लोकांना मदत करावी. 31 जुलैनंतर राज्यात लॉकडाऊन वाढवू नये. अन्यथा रस्त्यावर उतरुन याला विरोध करु. सरकार गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवतंय. मात्र, ती भीती आम्हाला दाखवायची नाही. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“शासनाने लोकांच्या वागणुकीवरुन परिस्थिती समजून घ्यावी. लोकांना ज्या-ज्या वेळी संधी मिळाली त्यावेळी त्यांनी फिजीकल डिस्टन्सिंगची आयशी तैशी केली. यातून त्यांनी आम्ही एकत्र आहोत हे दाखवून दिलं. लॉकडाऊनच्या मानसिक त्रासाची जाणीव लोकांना झाली आहे. त्यामुळे 31 जुलैनंतर लॉकडाऊन वाढला, तर वंचित बहुजन आघाडी शासनाच्या विरोधात जाईल.”

“मी स्वतः कोविडची टेस्ट करुन घेतली आहे. राज्य सरकारने आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधींची कोविड टेस्ट करुन घ्यावी. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, त्यांना शासनाने क्वारंटाईन करावं. मात्र, ज्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांना फिरायला रानमोकळ करावं,” असंही ते म्हणाले. मी उत्सुकतेपोटी कोरोना टेस्ट केली आहे. कोणी विचारलं तर प्रमाणपत्र दाखवता येतं, असंही ते मिश्किलपणे म्हणाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“इलेक्ट्रॉनिक्स मीडिया कोरोनाबद्दल भीतीदायक बातम्या पसरवत आहे. प्रिंट मीडिया मात्र आशादायक बातम्या देत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सरकार तिजोरीत पैसा नाही म्हणतं, मग टेंडर कसे काढून कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कसे देतं? असा प्रश्न त्यांनी विचारला. माझं इतर सर्व मुख्यमंत्र्याबरोबर जमलं, फक्त मुख्यमंत्री शरद पवारांसोबत जमलं नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा :

लॉकडाऊन वाढवू नका, नाहीतर उपासमारीने माणसं मरतील, प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती निवडणुका घेतल्याच पाहिजे, न्यायालयाने आदेश काढावा : प्रकाश आंबेडकर

ज्यांना एकदाही आरक्षण नाही, त्यांना आधी द्या, राजकीय आरक्षण संपवा, प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या मागण्या

Prakash Ambedkar on Lockdown extension

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *