युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती निवडणुका घेतल्याच पाहिजे, न्यायालयाने आदेश काढावा : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली आहे (Prakash Ambedkar demand Local Body Elections).

युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती निवडणुका घेतल्याच पाहिजे, न्यायालयाने आदेश काढावा : प्रकाश आंबेडकर

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली आहे (Prakash Ambedkar demand Local Body Elections). तसेच याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत आदेश काढावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारला राज्यपालांना प्रस्ताव पाठवून प्रशासक नेमण्याचा अध्यादेश काढण्याचा अधिकार नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला. याबाबतचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “राज्यात अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला आहे. काहींचा कार्यकाल संपलेला आहे. अशा ग्रामपंचायतीवर राज्य सरकारने प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याबाबतचा अध्यादेश राज्यपालांनी काढला. मुळात असा अध्यादेश शासनाच्या सांगण्यावरुन राज्यपालांना काढता येत नाही. शिवाय असा अध्यादेश राज्यपालांना काढता येतो का? हा ही एक मोठा प्रश्न आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अशाप्रकारे प्रशासक नेमण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्यपालांकडे शिफारस करावी लागते. तरच असा अध्यादेश काढता येतो. शिवाय प्रशासक म्हणून गैर अधिकारी ठेवता येत नाही. कारण त्याने त्या पदाची शपथ घेतलेली नसते. त्यामुळे त्याची नेमणूक घटनाबाह्य असते किंवा अशा व्यक्तीची नेमणूक केल्यावर त्याला शपथ देता येत नाही. शपथ देण्यासाठीची तशी कोणतीही तरतूद घटनेत नाही,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

लोकसभा, विधानसभा किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका कुठल्याही परिस्थितीत पुढे ढकलता येत नाही. 5 वर्षांची मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेतल्या पाहिजे. त्यासाठी न्यायालयाने कलम 243 ई पाहावे ही विनंती आहे. त्याच बरोबर निवडणूका कोणी घ्याव्यात, याबाबत कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. कलम 243 क नुसार निवडणूक घेण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगालाच आहेत. त्यामुळे राज्यपालांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याबाबतचा अध्यादेश केवळ राज्य निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसारच काढावा लागेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

“प्रशासन कारणं सांगून निवडणुका पुढे ढकलत आहे”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “प्रशासन काहीही कारण सांगून निवडणुका पुढे ढकलत आहे. त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट सांगावे, युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती निवडणुका घेतल्याच पाहिजे. निवडून आलेल्या लोकांना पाच वर्षांची मुदत असते. त्यानंतर त्यावर प्रशासक नेमता येत नाही. त्यामुळे निवडणुका झाल्याच पाहिजे असा निर्णय न्यायालयाने ठामपणे द्यावा.” याबाबत आंबेडकरांनी न्यायालयाला विनंती केली आहे, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

हेही वाचा :

ज्यांना एकदाही आरक्षण नाही, त्यांना आधी द्या, राजकीय आरक्षण संपवा, प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या मागण्या

प्रकाश आंबेडकर ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्र्यांसोबत 3 मुद्द्यांवर चर्चा

नाभिक समाजाच्या प्रश्नांसाठी वंचितला जोरदार लढा द्यावा लागला, तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar demand Local Body Elections

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI