3 महिन्याच्या बाळाचं अजून बारसंही नाही, नक्षली हल्ल्यात गडचिरोलीचा जवान शहीद

गडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा येथील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याची दाहकता हळूहळू समोर येत आहे. या हल्ल्यात 15 जवान शहीद तर त्यांच्या गाडीच्या खासगी ड्रायव्हरचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील  वडसा येथील प्रमोद भोयर यांचाही समावेश आहे. प्रमोद भोयर यांच्या निधनाच्या वृत्ताने भोयर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक म्हणजे प्रमोद भोयर यांना अवघ्या […]

3 महिन्याच्या बाळाचं अजून बारसंही नाही, नक्षली हल्ल्यात गडचिरोलीचा जवान शहीद
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

गडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा येथील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याची दाहकता हळूहळू समोर येत आहे. या हल्ल्यात 15 जवान शहीद तर त्यांच्या गाडीच्या खासगी ड्रायव्हरचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील  वडसा येथील प्रमोद भोयर यांचाही समावेश आहे. प्रमोद भोयर यांच्या निधनाच्या वृत्ताने भोयर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

धक्कादायक म्हणजे प्रमोद भोयर यांना अवघ्या 3 महिन्यांचं बाळ आहे. या बाळाचे बारसं अर्थात नामकरणसुद्धा झालेलं नाही. नुकतंच 28 एप्रिलला प्रमोद यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. भोयर कुटुंबात प्रमोद हे एकमेव कर्ते पुरुष होते. मात्र त्यांच्या जाण्याने भोयर कुटुंबाचा कणाच खिळखिळा झाला.

नक्षलवाद्यांचा हल्ला 15 जवान शहीद

नक्षलवाद्यांनी बुधवारी 01 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. शिवाय चालकाचाही मृत्यू झाला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर बुधवारी पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.

हल्ला नेमका कुठे झाला?

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. मंगळवारी नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. नक्षवाद्यांना माहित होत गाड्या जाळल्यानंतर तपासासाठी पोलीस येणार. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सापळा लावला होता, असं म्हटलं जात आहे.

शहीद जवानांची यादी

1) साहुदास मदावी – कुरखेडा- गडचिरोली

2) प्रमोद भोयर –  देसाईगंज- गडचिरोली

3) किशोर बोबाटे- आरमोरी- गडचिरोली

4) योगाजी हालमी- कुरखेडा- गडचिरोली

5) कुरणशाह दुगा- आरमोरी- गडचिरोली

6)लक्ष्मण कोदापे- कुरखेडा- गडचिरोली

7) भूपेश वालोदे-लाखणी- भंडारा

8) नितीन घोरमारे- साकोरा- भंडारा

9) राजु गायकवाड- मेहकर बुलढाणा

10) सर्जेराव खरडे- देउळगाव बुलढाणा

11) दिपक सुरुषे- मेहकर बुलढाणा

12) संतोष चव्हाण-औंधा-हिंगोली

13) तौशिब आरिफ शेख-पाटोदा बीड

14) अमृत भदादे- कुही नागपुर

15) अग्रमन रहाटे-अरणी- यवतमाळ

संबंधित बातम्या: 

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद 

गडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश

जनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले

नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक

गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?

आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!

गडचिरोली हल्ला : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो?

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.