AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील दयनीय अवस्थेला मुख्यमंत्री जबाबदार, निर्णय घेण्यास सरकार अपयशी : प्रसाद लाड

मुंबईत सध्या समन्वय न साधता लोकांचा छळ आणि पिळवणूक करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे, असा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

मुंबईतील दयनीय अवस्थेला मुख्यमंत्री जबाबदार, निर्णय घेण्यास सरकार अपयशी : प्रसाद लाड
| Updated on: Jun 29, 2020 | 7:20 PM
Share

रत्नागिरी : मुंबईतील कोरोनाच्या दयनीय अवस्थेला (Prasad Lad Criticize Thackeray Government) राज्य सरकार आणि मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली. राज्य सरकार कोरोनाच्या बाबातीत निर्णय घेण्यास अपयशी ठरल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे (Prasad Lad Criticize Thackeray Government).

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय कोण घेतं, हेच कळत नाही. मुंबईत सध्या समन्वय न साधता लोकांचा छळ आणि पिळवणूक करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे, असा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

मुंबईतील लॉकडाऊन उठवण्याची गरज नव्हती. आम्ही वेळोवेळी सांगतोय लॉकडाऊन उठवू नका, पण सरकारने ऐकलं नाही. आता जनतेच्या रागाचा बांध फुटायची वेळ आली असल्याचं मत प्रसाद लाड यांनी व्यक्त केलं. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचं दीड ते दोन हजार कोटीचं नुकसान झालं आहे. सरकार बांधावर गेले नाहीत, की बंदरावर गेले नाहीत, असं सांगत प्रसाद लाड यांनी कोकणातल्या निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीवरुन सरकारवर निशाणा साधला.

चीन संदर्भातील मुद्यावरुन काँग्रेसला सुनावणाऱ्या शरद पवारांच्या व्यक्तव्यावर प्रसाद लाड यांनी सावध भुमिका घेतली. शरद पवार यांच्याबद्दल आदर काँग्रेसने केला पाहिजे, त्यांनी या सूचना या मोदींसाठी नव्हे तर देशासाठी केलेल्या सूचना होत्या. पवार साहेबांना सिमेवरची जाण असलेला नेता आहे. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःची भुमिका काय हे सष्ट करायलाल हवं, असं मत प्रसाद लाड यांनी व्यक्त केलं. राहूल गांधी यांची रिघ ओढून काँग्रेसकडून टीका होणं हे चुकीचं असल्याचंही प्रसाद लाड म्हणाले (Prasad Lad Criticize Thackeray Government).

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री केस-दाढी कुठे करतात? नाभिक समाजावर अन्याय का? : प्रसाद लाड

भाजप आमदार प्रसाद लाड शिवसेना नेत्यांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

Devendra Fadnavis | कोरोनाच्या लढाईसह सर्वात भ्रष्टाचार, सरकारची रणनीती चुकीची : देवेंद्र फडणवीस

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.