AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काढ काढ काढली आणि बिळात जाऊन बसला, आता लक्ष्मण हाकेचा देखील पगार चालू करतो, प्रसाद लाड कडाडले..

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली. आता या टीकेला प्रसाद लाड यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी खडेबोल लक्ष्मण हाके यांना सुनावले. त्यांना प्रसाद लाड कोण आहे हे माहिती नसल्याचे सांगतानाही ते दिसले.

काढ काढ काढली आणि बिळात जाऊन बसला, आता लक्ष्मण हाकेचा देखील पगार चालू करतो, प्रसाद लाड कडाडले..
Prasad Lad
| Updated on: Aug 07, 2026 | 1:58 PM
Share

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठे विधान केले. त्यांनी थेट प्रसाद लाड यांच्या कानशिलात लगावणार असल्याचे म्हटले. ज्यानंतर खळबळ उडाली. आता लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना प्रसाद लाड दिसले. प्रसाद लाड यांनी म्हटले की, प्रसाद लाड कोण आहे अजून त्यांना माहिती नाही. त्यांनी आधी गुगल सर्च करावे. एका वाक्यात मागतो.. हाती चले बाजार कुत्ते भोके हजार.. अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही. असे अनेक आले आणि अनेक गेले. याच्यामागे चार लोक नाहीत. अमोल मिटकरीने काढ काढ काढली आणि नंतर बिळात जाऊन बसला. अशा लोकांवर न बोललेले चांगले. आपली संस्कृती अशी नाही. मी जे बोललो ते लक्ष्मण हाकेने ऐकले नाही. त्यावेळेस त्याचे कान बंद झाले असतील. ओबीसी आरक्षण संदर्भात देखील एखादा संघर्ष करावा लागला तरी प्रसाद लाड भावासारखा उभा राहील असे मी बोललो.

पुढे प्रसाद लाड यांनी म्हटले की, लक्ष्मण हाकेला पाहिजे असेल तर त्याचाही पगार चालू करतो. एक लाख लोकांना मी नोकरी देतो. लक्ष्मण हाकेचा देखील पगार चालू करतो. त्यांनी मला शिकू नये. माझ्या कंपन्या स्टॉक एक्सचेंजला आहेत. आमच्यावर मॉनिटरिंगसाठी हजारो यंत्रणा आहेत. आधी स्वतःने वडापाव गाडी टाकून दाखवावी नंतर आम्हाला सांगावे.

जो साधा सरपंच नाही सदस्य नाही त्याने आमदार एक वेळेस राज्यमंत्री सात वेळा मंत्री झालेल्या माणसाला शिकवू नये. मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, माझी आणि उदय सामंत आणि जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे. त्यांच्या मागण्यांवर चर्चा आणि अभ्यास सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आधी अधिवक्ता देखील काही कागदपत्रे पाठवून मार्गदर्शन मागितले.

मी देखील काही कागदपत्रे घेऊन अकरा बारा तारखेला तिथे चर्चेसाठी तिथे जाणार आहे.  निश्चितपणे मनोज जरांगे यांना उपोषण करायला लागणार नाही याचा प्रयत्न आमचा असेल. कारण मनोज जरांगे उपोषणाला बसले की त्यांचे बरोबर पाच पन्नास हजार मराठा समाजाचे लोक उपोषणाला बसतात.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...