AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक?

मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक?
| Updated on: Mar 24, 2025 | 5:01 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. कोरटकर याने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर तो फरार झाला होता, अखेर त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान कोरटकरच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘यामध्ये सरकारचं काही कार्यकर्तृत्व नाहीये, कारण जेवढं शक्य आहे, तेवढं महिनाभर महाराष्ट्र सरकारनं प्रशांत कोरटकरला प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन होता, कदाचित तो जामीन फेटाळला गेला असेल किंवा तो जामीन मिळणारच नाही याची त्याला खात्री झाली असेल. त्यामुळे तो सलेंडर झाला आहे, सलेंडर होताना तो महाराष्ट्रात नाही तर तेलंगणामध्ये झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातले सर्व आरोपी तेलंगणा, गुजरात अशा राज्यांमधून आणले आहेत. म्हणजेच महाराष्ट्र पोलीस कुचकामी ठरत आहेत.

सरकार पाठीशी असेल तर ते सर्व शक्य आहे. एक महिनाच काय आरोपीला पकडण्यासाठी सहा-सहा महिने लागू शकतात. कृष्णा आंधळे किती दिवस झाले फरार आहे. त्यामुळे सरकार पाहिजे तितके दिवस एखाद्याला बाहेर ठेऊ शकतं. प्रशांत कोरटकरला अटक करण्यामागे कालचा कुणाल कामराचा प्रकार आणि सगळंच अंगशी आलं म्हटल्यावर कुठून तरी त्यावर पडदा टाकला पाहिजे म्हणून त्याला अटक करण्यात आली असावी,’ असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रशांत कोरटकर याने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर तो कॉल माझा नव्हता असा दावा देखील त्याने केला होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा