AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या ‘या’ रणनीतीमुळे शिंदे गटातील खासदार अस्वस्थ

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन मतभेद सुरु आहे. त्याचवेळी भाजप अन् शिवसेना युतीमध्ये सर्व काही आलबेल नाही. युतीमध्ये दावे-प्रतिदावे करत २०२४ ची तयारी सुरु केली आहे.

भाजपच्या 'या' रणनीतीमुळे शिंदे गटातील खासदार अस्वस्थ
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 30, 2023 | 11:39 AM
Share

चंदन पुजाधिकारी, नाशिक : राज्यात गेल्या १० महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. शिवसेनेने भाजपशी घरोबा करून मुख्यमंत्रीपद घेतले. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. आगामी निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढवणार आहे. परंतु भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक १३ शिवसेना खासदारांच्या मतदारसंघांमध्येही आपली तयारी सुरु केली आहे. भाजपने चालवलेल्या या जोरदार तयारीच्या पार्श्वभूमीवरच सावध शिंदे गटाकडून २२ जागा लढण्याचा दाव केला गेला. त्याचवेळी भाजपने शिंदेंच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांमध्ये समांतर प्रचार यंत्रणा राबविण्याचे काम हाती घेतले आहे.

काय केले भाजपने

शिंदें गटाचा दावा असलेल्या मतदार संघात भाजपाने संयोजक नेमले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या 13 खासदारांच्या मतदारसंघात देखील भाजपाने संयोजक नेमले आहेत. या मतदार संघात भाजपाने संयोजक नेमल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात देवयानी फरांदे यांना तर शिर्डीत विखे पाटील यांना संयोजक म्हणून जबबदारी दिली आहे. हे भाजपाचे दबावतंत्र आल्याची शिंदे गटात कुजबुज सुरु झालीय.

का सुरु केली भाजपने तयारी

कोणते मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जातील? याबाबत अजून निर्णय झालेला नाही. यामुळे हा मतदार संघ कोणाकडे आहे, याचा विचार न करता तयारी करा. जागावाटपात पुढे काय होईल, ते नंतर ठरणार आहे. परंतु आपल्या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे म्हणून काही करण्याची गरज नाही, असे अजिबात समजू नका, असे निर्देश खालपर्यंतच्या यंत्रणेला दिले गेले आहेत. तसेच भाजपइतकी संघटनात्मक रचना शिंदे गटाकडे नाही. त्यामुळे त्यांना भाजपवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

शिंदे गटाची काय आहे तयारी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना खासदारांची नुकतीच बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना 48 पैकी 22 जागा लढवणार असल्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली होती. या बैठकीनंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी ही माहिती दिली.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा