AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्वीचे गुन्हे मागे नाहीच, आता दाखल झाले आणखी दोन गुन्हे, जरांगे पाटील यांच्या सभेची कुणी घेतली धास्ती?

एका सभेच्या ठिकाणाहून दुसऱ्या सभेला जाताना त्यांना भेटण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्याशी एक शब्द बोलण्यासाठी, त्यांचे औक्षण करण्यासाठी एकच गर्दी होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित सभेला फार उशीर होत आहे.

पूर्वीचे गुन्हे मागे नाहीच, आता दाखल झाले आणखी दोन गुन्हे, जरांगे पाटील यांच्या सभेची कुणी घेतली धास्ती?
MANOJ JARANGE PATIL Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Nov 21, 2023 | 9:07 PM
Share

मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात सभांचा धडाका सुरु केलाय. मराठा आरक्षणाची मागणी घेऊन जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. या सभांमधून जरांगे पाटील हे आरक्षण मिळणार असे सांगत आहेत. तर, अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांना प्रत्युत्तर दिले. त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने जरांगे पाटील यांना दिले. त्याचीही आठवण जरांगे पाटील या सभेमधून करून देत आहेत. एकीकडे पाटील आपल्या सभांमधून सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभांमुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभा ठिकठिकाणी होत आहे. मात्र, एका सभेच्या ठिकाणाहून दुसऱ्या सभेला जाताना त्यांना भेटण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्याशी एक शब्द बोलण्यासाठी, त्यांचे औक्षण करण्यासाठी एकच गर्दी होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित सभेला फार उशीर होत आहे. तरीही लोक त्यांच्या प्रतीक्षेत रात्र रात्र वाट पाहतात हे विशेष.

मनोज जरांगे पाटील यांची भुम तालुक्यातील ईट येथे प्रचंड मोठी सभा झाली. हजारो लोक या सभेला जमले होते. मात्र, याच सभेच्या आयोजकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला. ईट येथे मराठा आरक्षणाची सभा आयोजीत करणारे आयोजक संदीपान कोकाटे आणि आप्पासाहेब देशमुख या दोघांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय. जिल्हाधिकारी यांचे जमाव बंदी आदेश लागु असतानाही जरांगे पाटील यांची सभा घेतल्याच्या आरोपाखाली आयोजकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 188 कलमासह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये वाशी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आयोजक संदीपान कोकाटे आणि आप्पासाहेब देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे मराठा समाज अधिक आक्रमक झाला. वाशी पोलीस ठाण्यात मराठा समाजाने ठिय्या आंदोलन सुरु केले. गुन्हे दाखल करुन शांततेच्या मार्गाने चालु असलेले आंदोलन दडपले जात आहे. आम्ही त्याला भीक घालत नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा संकल्प यावेळी आंदोलकांनी केला.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सातारा येथे सभेचे आयोजन करणाऱ्या आठ आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मनोज जरांगे पाटील यांचा नुकताच पश्चिम महाराष्ट्र दौरा झाला. यावेळी सातारा जिल्ह्यातही त्यांच्या पाच सभा पार पडल्या. मायणी येथे झालेल्या सभेत आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. ध्वनीक्षेपक वेळेची मर्यादा ओलांडली या कारणावरून 8 आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र, त्यांच्या सभांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल होत आहेत. जरांगे पाटील यांच्या सभांना होणारा विलंब पाहता आपल्यावरही अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार की काय अशी भीती आता अन्य आयोजकांना वाटत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.