मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं, आम्हाला संविधान वाचवायचं आहे-पृथ्वीराज चव्हाण

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं, आम्हाला संविधान वाचवायचं आहे-पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे, त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो असे वक्तव्य केले आहे.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 22, 2022 | 3:53 PM

नाशिक : देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकीवरून (Five State Elections) राजकाण तापलंय. त्यात भाजपमध्ये होणाऱ्या बंडखोरीने आणखी खतपाणी घातलं आहे. अशातच काँग्रेसकडून (Congress) चारी बाजुंनी भाजपला (Bjp) घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे, त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो असे वक्तव्य केले आहे. देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवाचंय. मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडलीय, लोकं बेरोजगार झालेत, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय आखाडा पुन्हा तापला आहे. पाच राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष जोमाने उतरले आहेत, उत्तर प्रदेशात सध्या योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मोदी केवळ भाषणबाजी करतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाषणबाजी करतात, त्यांना केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत, देशाकडे मोदींचं लक्ष नाही, असा घणाघातही त्यांनी केला आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मुंबई महापालिका निवडणूकही काँग्रेस स्वबळावर लढणार असा नाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काही तडजोडी करून महाविकास आघाडी तयार केली. चंद्रकांत पाटील भाजप किती लवकर सत्तेत येते, याची स्वप्न पाहत आहेत, त्यांनी स्वप्न बघत रहावी अशी कोपरखिळीही त्यांनी मारली आहे.

मुख्यमंत्र्यांचे काम व्यवस्थित सुरू

मुख्यमंत्र्यांच्य तब्येतीवरून आणि त्यांच्या बाहेर न पडण्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सतत टिका होत आहे. त्यावरी पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांचं काम व्यवस्थित सुरुय, फक्त आताच त्यांचं ऑपरेशन झालंय, ते वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांच्या फिरण्यावर काही बंधनं आहेत असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. गेल्या अधिवेशनावेळीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी असा सल्ला दिलेला, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरेंकडे द्यावा, असा टोला महाविकास आघाडीला लावला होता. काही दिवसांपू्र्वीच मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत, त्यावरूनही बराच पोलिटिकल राडा झाला.

VIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला

सत्तार उद्या शिवसेनेत राहण्याचीच खात्री नाही, दानवेंना नांगरावर पाठवणारा कुणीही नाही, डॉ. भागवत कराड यांची खरमरीत टीका!

VIDEO: शेलार म्हणाले, गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट जरी वाचले तरी… ; राऊतांनी ऐकवला मराठा साम्राज्याच मूलमंत्र!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें