AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमी खेळणाऱ्यांना दोष द्यायचा की…, माणिकराव कोकाटेंच्या व्हिडीओवरून पृथ्वीराज चव्हाणांचा थेट सवाल

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते पुण्यात बोलत होते, यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

रमी खेळणाऱ्यांना दोष द्यायचा की..., माणिकराव कोकाटेंच्या व्हिडीओवरून पृथ्वीराज चव्हाणांचा थेट सवाल
Prithviraj ChavanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 24, 2025 | 8:28 PM
Share

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते पुण्यात बोलत होते. पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला होता, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं, यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले चव्हाण?  

विधिमंडळाला एक दर्जा आहे, लोकशाहीच्या मंदिरात जे चालू आहे ते लज्जास्पद आहे. सत्ताधारी पक्षांकडून बेशिस्त वर्तन होत आहे हे दुर्दैवी आहे, सभागृहात वापरली जाणारी भाषा मुलांच्या कानावर पडली तर काय परिणाम होतील? सभागृहाच्या बाहेर गुंड आणून मारामाऱ्या होत आहेत,  असं यावेळी चव्हाण यांनी म्हटलं.

दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता, या व्हिडीओवरून वातावरण चांगलंच तापलं, विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारची कोंडी केली. यावर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना दोष द्यायचा की ऑनलाईन रमी सुरु करणाऱ्या मोदी सरकारला दोष द्यायचा ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ऑनलाइन रमीमधून कर गोळा करण्याची व्यवस्था सरकारने केली आहे, मंत्री पदावरची माणसंही ऑनलाइन जुगाराचा मोह टाळू शकत नाहीत,  ऑनलाइन जुगारामुळे पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत. कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा की नाही? हे त्यांना ज्यांनी मंत्री केलं त्यांनी ठरवावं. फॅसिस्ट प्रवृत्तीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सत्ताधारी पक्षानं काही केलं तर विरोधकांनी प्रत्युत्तर देणं साहाजिकच आहे. मात्र दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी अशा पद्धतीचं वर्तन करू नये,  काँग्रेसची आत्ताच्या सत्ताधाऱ्यांशी तुलनाच होऊ शकत नाही,  हे अगदी निर्ढावलेली लोक आहेत, यांना कशानेच काही फरक पडत नाही, असा जोरदार हल्लाबोल यावेळी चव्हाण यांनी केला आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच