AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेश्या महिलांच्या मुलींचे देश-विदेशात कौतुक, लालबत्ती नाटकातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न

कामाठीपुरा विभाग जगभरात रेड लाईट विभाग म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय (LaalBatti Drama) सुरु असतो.

वेश्या महिलांच्या मुलींचे देश-विदेशात कौतुक, लालबत्ती नाटकातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न
| Edited By: | Updated on: Feb 27, 2020 | 10:33 AM
Share

मुंबई : कामाठीपुरा विभाग जगभरात रेड लाईट विभाग म्हणून ओळखला जातो. हा विभाग मुंबईत आहे. येथे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय (LaalBatti Drama) सुरु असतो. काही वेश्या येथे नाईलाजाने तर काही वेश्या महिलांना मानव तस्करीमध्ये फसवून आणले आहे. त्यामुळे त्यांची अनेक स्वप्नं तुटलेली आहेत. पण या वेश्या महिला आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘क्रांती’ एनजीओने या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलींची जबाबदारी (LaalBatti Drama) घेतली आहे. याच एनजीओतर्फे या मुली आज देश-विदेशात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या जीवनावर आधारीत असलेले नाटक सादर करत आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून या मुलींचे कौतुक केले जात आहे.

क्रांती एनजीओ सांभाळत असलेल्या या मुलींनी वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या विभागाचे वर्णन ‘लालबत्ती’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडले आहेत. या मुलींनी आपल्या आईच्या जीवनावर आधारित एक नाटक तयार केले आहे. ज्याचे नाव लाल बत्ती आहे. हे नाटक त्यांनी स्वत: लिहिले आहे. तसेच स्वत:च त्यांनी या नाटकाचे दिग्दर्शनही केले आहे. आतापर्यंत त्यांनी भारतासह अमेरिका, लंडन, युरोप, नेपाळ आणि भूतानसारख्या देशातही हे नाटक सादर केले आहे.

कामाठीपुरामधील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुली सध्या देश-विदेशात आपले नाव रोशन करत आहेत. रेड लाईट विभागात जन्म झालेल्या मुली लहानपणापासून आपल्या आईला वेश्या व्यवसायाचे काम करताना पाहत आहेत. त्यामुळे येथील मुलींना बऱ्याचदा आपली ओळख लपवावी लागते. पण आता या मुली बिनधास्तपणे आपली ओळख न लपवता काम करत आहेत.

क्रांती एनजीओ कामाठीपुरामधील वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींना एक नवीन जीवन देण्याचे काम करते. तसेच या नव्या वातावरणात मुली आणखी बिनधास्तपणे जीवन जगत आहेत. विशेष म्हणजे या मुलींमध्ये काही मुली अशा आहेत ज्यांना वेश्यावृत्तीमध्ये ढकलण्यात आले होते. पण आता यामधून त्या बाहेर आल्या आहेत आणि आपल्या जीवनाला नवीन दिशा देत आहेत. यामधील अनेक मुली शिक्षण घेत असून आपले भविष्य घडवत आहेत.

“आम्ही ज्या विभागात राहतो त्या विभागात राहणारे काही लोक आपली ओळख लपवतात. पण आमचे लहानपण तिथे गेले आहे. आता जे काही आहे आमच्यासाठी ते सर्वस्व आहे. आम्ही आज जे नाटक करतोय त्याचे नाव लालबत्ती एक्स्प्रेस आहे. यामधून आम्ही त्या विभागातील वास्तव सर्वांसमोर मांडतो, असं एका मुलीने सांगितले.

दरम्यान, लालबत्ती नाटक पाहून अनेकजण या मुलींचे कौतुक करत आहेत. तर काहींनी अश्रू अनावर होत आहेत. बोलकं आणि वास्तववादी रेड लाईट विभागातील चित्र यातून मांडण्यात आलं आहे.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.