AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन; पोलिसांकडून धरपकड, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांचा ठिय्या

Mumbai CPI(M) Protest: दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईत उमटले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. याविरोधात पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन; पोलिसांकडून धरपकड, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांचा ठिय्या
| Updated on: Oct 10, 2026 | 5:58 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मार्स्कवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र हे आंदोलन आता चिघळल्याचे दिसून आले आहे. आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच तुषार गांधींनाही ताब्यात घेतले आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी त्यांना सोडवण्यासाठी ठिय्या केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मार्स्कवादी कम्युनिस्ट पार्टी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करत आहे. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून मुंबई पोलीस मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत. यावेळी आंदोलनात समर्थन देण्यासाठी आलेला बॉलीवूड अभिनेता इम्रान खानलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऑगस्ट क्रांती मैदानावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनामुळे ऑगस्ट क्रांती मैदानावर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे.

सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माकपचं हे आंदोलन सुरू आहे. माकपचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर दुसरीकडे डीएन नगर पोलिसांनी तुषार गांधींनाही ताब्यात घेतले आहे. यानंतर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. यानंतर तुषार गांधींच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या केला आहे. तुषार गांधींना सोडण्याची कार्यकर्ते मागणी करत आहे. तसेच संजय राऊत आणि आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनमध्ये बसले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेऊन गावदेवी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी ऑगस्ट क्रांती मैदान बॅरिकेड्स लावून बंद केले आहे. काही आंदोलकांना ग्रँट रोडवर ताब्यात घेण्यात आले आहे.

तर दुसरीकडे नाना चौक स्कायवॉककडे जाणाऱ्या मार्गावर निर्बंध घालण्यात आले होते. आंदोलकांनी पोलिसांकडे त्यांच्या अटकेचे आदेश दाखवण्याची मागणी केली. अंधेरी पश्चिममधील डीएन नगर पोलीस ठाण्याबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. तसेच अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते कारण परिसरात वाढवलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जमू लागले होते.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक