AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार, घरी कोणी नसताना आजोबानेच टाकला हात; राज्यभरात संताप!

पुण्यात येवलेवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नराधमाने 9 वर्षीय चिमुकलीवर आजोबानेच अत्याचार केला आहे. या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार, घरी कोणी नसताना आजोबानेच टाकला हात; राज्यभरात संताप!
pune newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 17, 2026 | 9:45 PM
Share

Pune Rape Case : विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे या शहराला आता गुन्हेगारीचं माहेरघर म्हणावे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये येथे बलात्काराच्या धक्कादायक घटना घडलेल्या आहेत. विशेष म्हणजे यातील काही घटना या चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याच्या आहेत. नुकतेच पुण्यातील भोर तालुक्यात एका 60 वर्षीय व्यक्तीने एका चिमुकीवर बलात्कार करून तिची हत्या केली. त्यानंतर पुण्यातील पर्वती येथे एका 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आले म्हणून ती चिमुकली सुदैवाने वाचली. या सर्व घटना ताज्या असतानाच आता पुण्यात आणखी एक बलात्काराचा गंभीर प्रकार घडला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका 9 वर्षीय लहानगीवर बलात्कार करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव धनराज बालाटी असे आहे. हा नराधम 38 वर्षांचा आहे. त्याने ज्या मुलीवर अत्याचार केला आहे, ती अवघी 9 वर्षांची आहे. विशेष म्हणजे हा आरोपी पीडित मुलीचा नात्याने चुलत आजोबा लागतो.

पीडित मुलीचे आई-वडील बाहेर गेले अन्…

घरात कोणीही नसल्याची संधी साधत या धनराज बालाटी नावाच्या नराधमाने आपल्या 9 वर्षीय नातीवर हात टाकला आहे. पीडित मुलीचे कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी नेपाळवरून पुण्यात आलेले आहे. पीडित मुलीचे आई-वडील हे बाहेर गेले होते. आरोपी पीडित मुलीच्या घराशेजारीच राहायचा. त्याने मुलीच्या घरी तसेच आजूबाजूला कोणीही नसल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला आहे.

आरोपीला कठोर शिक्षा द्या

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. लवकरच या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. परंतु पुण्यासारख्या भागात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या आरोपीवर लवकरात लवकर खटला चालवावा. तो गुन्हेगार असल्याच त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Follow Us
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना इशारा, काय म्हणाल्या?
सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह...
Vinayak Raut | सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह विभागाकडून...
परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या...
Abhijeet Dipke | परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या आंदोलनानंतर अभिजित दिपकेंचा सरकारला थेट इशारा
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
Eknath Shinde Video | गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?