शरद पवार यांच्या गडात भाजपचे मोठे ऑपरेशन, सुप्रिया सुळेंच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारा नेता भाजपच्या वाटेवर

संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्याबाबत त्यांनी अमित शाह यांच्यासोबतही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. थोपटे तीन वेळा भोर विधानसभा मतदार संघातून आमदार राहिले आहेत. त्यांचे वडील या मतदार संघात सहा वेळा आमदार होते. संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडली तर पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे.

शरद पवार यांच्या गडात भाजपचे मोठे ऑपरेशन, सुप्रिया सुळेंच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारा नेता भाजपच्या वाटेवर
Sangram Anantrao Thopate
| Updated on: Apr 19, 2025 | 9:14 AM

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पुन्हा एक मोठा धक्का बसणार आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या गडात भाजप सर्जिकल स्टाईक करण्याच्या तयारीत आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे काँग्रेस नेते संग्राम थोपटे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी फेसबुक प्रोफाईलमध्ये बदल करुन त्याबद्दलचे संकेत दिले. दरम्यान, या प्रकरणाबाबत अजून काँग्रेसकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही.

काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवरील कव्हर फोटो बदलला आहे. यापूर्वी असलेल्या कव्हर फोटोवर असणारे काँग्रेसचे चिन्ह नव्याने अपडेट केलेल्या कव्हर फोटोवर नाही. याधीच्या कव्हर फोटोवर काँग्रेस चिन्ह हाताचा पंजा आणि त्याच्यापुढे संग्राम थोपटे यांचे नाव आणि फोटो होता. मात्र नव्याने अपडेट करण्यात आलेल्या कव्हर फोटोवर फक्त संग्राम थोपटे यांचे नाव आणि फोटो आहे. काल रात्री त्यांच्याकडून हा फोटो कव्हर फोटो म्हणून अपडेट करण्यात आला आहे. त्यामुळे ते काँग्रेसला राम राम ठोकणार असल्याचे संकेत मिळत आहे. याबाबतची अधिकृत भूमिका ते रविवारी जाहीर करणार आहेत.

संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशी चर्चा गेल्या 2 दिवसापासून रंगत आहे. त्यातच त्यांनी आता आपला फेसबुक प्रोफाइलचा कव्हर फोटो बदल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र यावरून गेली चार दशके काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देणार आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे दिग्गज नेते अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहे.