AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : खाऊ आणायला नातवाला धाडलं, नंतर नराधम आजोबाने नातीला… त्या पत्र्याच्या घरात काय घडलं ?

पुण्यातील बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. भोरमध्ये एका चिमुकलीची हत्या झाली, तर पर्वतीत ७० वर्षीय आजोबाने आपल्याच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न यातून पुन्हा एकदा समोर आला आहे.

Pune Crime : खाऊ आणायला नातवाला धाडलं, नंतर नराधम आजोबाने नातीला...  त्या पत्र्याच्या घरात काय घडलं ?
| Updated on: May 06, 2026 | 11:20 AM
Share

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात 65 वर्षांच्या नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. गेल्या आठवड्यात घडलेला हा प्रकार ऐकून अंगाला सुटलेला कापरा अजून कमी झाला नाही, तोच पुण्यातील पर्वती येथे एका आजोबाने स्वत:च्याच नातीच्या अंगावर हात टाकायचा प्रयत्न केल्याची आणखी एक विकृत, धक्कादायक, आणि तितकीच हादरवणारी बातमी समोर आली. एका पत्र्याच्या घरात हा प्रकार घडत होता, मात्र सुदैवाने शेजारी राहणाऱ्या महिलेना त्या छोट्या मुलीचा आवाज ऐकला. आणि तिने इतरांना बोलावत त्या आरोपीच्या घराचा दरवाजा बडवला. शेजाऱ्यांच्या प्रसंगवाधानामुळे आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच मोठा अनर्थ टळला.

पर्वतीच्या पायथ्याशी घडलेल्या या घटनेतील आरोपी अंबादास यल्लाप्पा जाधव हा 70 वर्षांचा असून त्याने त्याच्याच सख्ख्या मुलीच्या मुलीवर, आपल्याच नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारी राहणारी महिला धावू आली आणि तिच्यामुळे नातीच सुटका झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या.

नातवाला खाऊसाठी पैसे दऊन बाहेर धाडलं आणि…

पर्वती येथे ही घटना कशी घडली आणि मोठा अनर्थ होता होता कसा टळला याची विस्तृत माहिती आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नराधम आरोपी अंबादास याला, त्याचे नातू व नात भेटण्यासाठी आले होते. तेव्हा आरोपीने त्याच्या नातवाला पैसे दिले आणि खाऊ घेऊन ये असं सांगितल. नातू बाहेर गेल्यानंतर नराधमाने त्याचा कार्यभाग साधण्याचं ठरवलं. त्याने दार लावून घेतलं, नंतर आरोपीने त्याच्या नातीच्या अंगावरील कपडे काढले, मग त्याचे स्वत:चे कपडेही काढून टाकले.

मात्र आरोपी हा पत्र्याच्या घरात राहत असल्याने, शेजारी राहणाऱ्या महिलेचं लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्या मुलीच्या प्रतिकार आवाज आल्याने शेजारच्या महिलेला सगळा प्रकार समजला आणि तिने मदतीसाठीधाव घेतली. आणि अनर्थ टळला.

पोलिसांनी काय सांगितलं ?

याप्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र ससाणे यांनी माहिती दिली. आम्हाला रात्री 9.30 वाजता पर्वतीच्या पायथ्याशी लैंगिक अत्याचाराची माहिती मिळाली. त्याने स्वतः च्या नातीला (वय 9) खोलीत बोलवलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारच्या महिलेच्या प्रसंगावधानामुळे अनुचित प्रकार थांबला. त्या मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पीडित मुलीची प्रकृती व्यवस्थित आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Follow Us
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...